मातंग समाजाचा इतिहास

मातंग समाजाचा इतिहास

मातंग  समाजाचा इतिहास 

मातंग समाज अतिशय पुरातन कालापासून असून ती  एक राजकीय जमात होती. या समाजात थोर ऋषि, मुनि, योगी पुरुष, व  महान असे विचारवंत होऊंन गेले. मातंग समाज प्रगल्भ विदवत्ता  धारक   होता. या समाजाने विविध विषयात नावीन्य प्राप्त केले होते. जप तप, साधना , आराधना, सत्वशील वृत्ति, तसेच शौर्य, ध्येय या विशेष गुणांनी संपन्न होता. गुरुकुलांची परंपरा असणारा समाज शुद्र अतिशूद्र वर्गात कसा गेला ? त्याला वाळीत कोणी टाकले ? याचे चिंतन करने गरजेचे आहे.
        जो समाज भूतकाळ विसरतो तो भविष्यात प्रगति करू शकत  नाही. जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. म्हणून मातंग समाजाला भूतकाळ म्हणजे इतिहास सांगण्याची गरज भासू लागली आपल कुळ काय ? आपल गोत्र काय ? आपले पूर्वज कोण होते याचे स्मरण करने आवश्यक वाटते कारण माणूस ज्याचे स्मरण करतो त्याचशी संबध जोडत असतो. आपल्या पूर्वजांचे मौलिक विचार मातंग समाज विसरलेला आहे. मातंग समाजाचा पूर्व इतिहास पुन्हा तेजोमय किरणा ने अंधाराकडून प्रकाशाकडे घेवून जाणारा आहे. आपल्या तरुण पिढीला जागृत करन्यासाठी नव संजिवनी देण्यासाठी आणि शुद्राकडून ब्राह्मण्य कड़े वाटचाल करण्यासाठी मानव निर्मिति पासून आजपर्यंत चा इतिहास सांगणे आवश्यक आहे.

श्रीकृष्णाचे गुरू मातंग ऋषी सांदीपनि- 
अवंती [उज्जैनी ]वनात एक सांदीपनि नावाचे मातंग ऋषी आपले सह परिवारा राहत असत। चारी वेद निपुण होते। परस्री आणि परधन या कड़े त्यांचे लक्ष नसे.भाग्यवंताची स्तुती करावी आणि दुबळ्याची हेटाळणी करावी असा भेदभाव करत नसत . त्यांच्या जवळ अहंकाराला थारा नव्हता . सांदिपनी ऋषी स्वावलंबी  होते . अरण्यात शिन्दीची झाडा वरील पनाळ्या ते आपल्या हातातील शास्राने मंत्र उपचाराने झाडावर न  चढता अपोआप तोडत असत त्या  मुळे त्यांचे नाव  शिंदी पाल पडले होते . सांदिपनी आपल्या शिशांच्या हृदयातील आध्ञान चा अंधार दूर करून ध्यानाचा प्रकाश पाडून देण्यात ते तरबेज होते . सांदीपनी ऋषी  बुद्धिवान आणि अनेक गुंनानी संपन्न होते.
कृष्ण -बलराम -सुदामा यांना सांदीपनि ऋषि कडून अनुग्रह -
सांदीपनी ऋषीची शिकवण -दुसऱ्याच्या नाशाची कधीही इच्छा करू नये. इंद्रिय मनावर ताबा मिळवावा.रागा लोभाने भावना प्रधान होऊ नये.आपण कोणाचेही वाईट करू नये.निंदकास क्षमा असावी.परोपकार हेच पुण्य व पर पिडा हे पाप समजावे ,अशी शिकवण ते देत असत. सांदीपनी ऋषीचे उपदेश कार्य शुद्ध प्रेम  भक्ती ,शांती ,प्रिती , आणि मुक्तीचा मार्ग म्हणून  श्रीकृष्ण ,बलराम ,सुदामा  हे सदैव  देहभान व रममाण होत असत .  श्रीकृष्ण ,बलराम ,सुदामा हे सांदीपनी ऋषी कडे आश्रमात चौसष्ट दिवस होते . या काळात सर्व विध्या मुक्त हस्त पणे अवगत केल्या .
 [हरीविजय २० अद्याय ]-श्रीकृष्णाने गुरु पुत्र स्वर्गातून जिवंत करुण गुरुस परत दिला 
मातंगी माता -
[मातंगी पुर्नत्व उच्चते]
//ओम र्हिं मातंगी महामाये सदानंद स्वरूपिणी //
//प्रणामामी सदा अंबे मातंगी माधुरानाना //
शिवशक्तीच्या दहावा अवतार पैकी नववा अवतार शंकर पार्वतीने मातंग-मातंगी म्हणून घेतला . मातंगी महादेवाची कश्ती असून सर्व देवदेवता ची वरदायिनी  आहे . मातंगी देवीला संतती व संपती राखणारी देवी म्हणून पुजीले जाते . दक्षिण भारतात मातंगी स  मांगम्मा असेही म्हणतात .तिरुपति ,बालाजी ,चेन्नई येथे देवीची मंदिरे आहेत . आंध्र ,गुजरात ,तामिळनाडू या प्रांतामध्ये मातंगी मंदिरे आहेत .
महा लक्ष्मी तुळजापुर ची देवी हि मातांगाचीच आई आहे .[हरिचंद्र व्याख्यान ]
लहुजी वस्ताद साळवे

क्रांतिपिता लहुजी राघोजी साळवे( राऊत )(१४ नोव्हेंबर १७९४,१७ फेब्रुवारी १८८१) क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७९४ ला पुरंदर गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावी झाला. लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे (राऊत) व आईचे नाव विठाबाई होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. त्यामुळे शिवरायांनी आपल्या कार्यकाळात लहुजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदार्या सोपविल्या होत्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘राऊत’ या पदवीने गौरविले होते.
पुढे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे भयानक युद्ध झाले. १२ दिवस राघोजी व सळसळत्या तरुण रक्ताच्या २३ वर्षे वयाच्या लहुजी साळवेंनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. राघोजी साळवे या स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोर शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. हिंदवी स्वराज्याचे भगवे निशाण शनवारवाड्यावरून हटवून इंग्रजांचा युनियन जॅक फडकला.
या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली. स्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती, देशप्रेमाने लहुजींना आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दु:खातून सावरले. भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणी लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी (थडगे) उभारली. ही समाधी अजूनही ‘वाकडेवाडी’ येथे आहे.
आपल्या शूरवीर वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांना शिकस्त देण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्ध कलाकौशल्याचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी १८८२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर, सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, उमाजी नाईक, फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हेदेखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.
२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला. क्रांतिवीर लहुजी साळवेंच्या समाधी संगमवाडी (पुणे) येथे आहे
  1. इ.स. १८४८ साली लहुजींच्या तालमीत सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भरु लागली.


                                    मुक्ता साळवे 

भारतीय  स्वातंत्र्याच्ये जनक आद्य क्रांति गुरु लहुजी साळवे यांची पुत णी  मुक्ता  साळवे हिचा जन्म 
२५ डिसेम्बर १८४१ ला झाला.मुक्ता  साळवे इयत्ता ३ रीत  असताना  वय वर्षे १४ दी.  १५ फेब्रुवारी १८५५ साली राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शाळेत शिकत असताना  "मांग महाराचे दुःख" हा निंबध लिहिला. हा निबंध त्यावेळच्या पुण्यातील  मराठी वृत्तपत्रात दी. १५ फेब्रुवारी१८५५ रोजी छापून प्रकाशित झाला.  इंग्रज गवर्नर मेजर कैंडी यांनी ती च्या निबंधाला  प्रथम पारितोषिक दिले. मेजर कैंडी साहेबांनी भर सभेत तिचा सत्कार केला. त्या  सत्काराला  मुक्ता  साळवेनी  इंग्रजीतून  उत्तर दिले मुक्ता भर  सभेत म्हणाली " Sir give us library not chocolates" 


मांग महारांचे दुःख 


१. ईशवराने  मज दिन  दुबऴईच्या अंतकरणात आम्हा दुर्दॆव्व  पशुपेक्षा नीच मानलेल्या  दरिद्री मांग महारां च्या दुःखा  विषयी भरविले त्याच जगत्कर्त्याचे मनात चिंतन करून  या निबंधाविषयी  मी आपल्या शक्तीप्रमाणे हा विषय लिहिण्याचे  काम हाती सरसावून घेतले आहे. परन्तु बुद्धिदाता व निंबधास  फळ  देता मांग महारास व ब्राह्मणस उत्पन्नकर्ता जगन्नाथ आहे 

२. महाराज आता जर वेद  आधारेकडून आमचा द्वेष करणारे लोक यांच्या मताचे  खंडन करावे तर हे आम्हापेक्षा उंच विशेष करून  लाड़ूखाऊ ब्राह्मण लोक असे म्हणतात, कि वेद  तर आमचिच  सत्ता आहे. आम्हीच याचे अवलोकन करावे तर यावरुन उघड दिसते, कि आम्हास धर्मपुस्तक नाही. जर वेद  ब्राह्मणांसाठी आहेत, तर वेदाप्रमाणे वर्तणूक करने हा ब्राह्मणांचा धर्म होय. जर आम्हास धर्मसंबधी   पुस्तके पाहण्याची मोकळिक  नाही, तर  आम्ही धर्मरहित आहोत  असे साफ़ दिसते कि नाही बरे ! हर हर, असे वेद  कि ज्याचे  (ब्राह्मणांच्या मताप्रमाणे ) अवलोकन केल्याने महापातक घड़ते, तर मग त्यांच्या आधारे आचरण केल्याने आम्हाकडे किती  मूर्खत्व (दोष) येईल बरे ? व् इंग्रज लोक बायबलाच्या आधारेकडून आणि ब्राह्मण लोक वेदाधारेकडून चालतात, म्हणूनच ते आपापल्या खरया  खोट्या धर्माप्रमाणे जास्त  कमी आम्हापेक्षा सुखी आहेत असे वाटते. तर हे भगवान तुजकडून आलेला कोणता  धर्म तो आम्हास कळव,  म्हणजे आम्ही सर्व त्याचा सारिखयारितीने अनुभव घेऊ, परन्तु ज्या  धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व बाकीच्या नि खादाड  मनुष्याच्या तोंडकडे पाहावे, तो व त्यासारखे  दूसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होतील व अशा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनात देखील न येवो. 

३. उदक हे ईश्वराची देणगी आहे, त्याचा उपभोग सर्व गरिबांपासून पासून श्रीमंतापर्यंत एक सारखा घेता येतो, परन्तु वेद  हे देवाकडून जर आले म्हणावे तर याचा अनुभव ईश्वराकडून  उत्पन्न  झालेल्या मनुष्यास घेता येतो परन्तु वेद  हे देवाक डू  न  जर आले म्हणावे तर याचा अनुभव इश्वरांकडून उत्पंन झालेल्या मनुष्यस घेता येत  नाही. काय ही ही आश्चर्याची गोष्ट ! या विषयी बोलायस  देखील लाज वाटती. पहा एका बापापासून  चार मुले झाली, त्यांची मत्ता त्या  चार मुलानी एकसारखी वाटून घ्यावी ,  असा सर्वांच्या धर्मशास्त्रांचा कल आहे, परन्तु एकानेच घ्यावी व बाकीच्याणी पशुवत आपल्या बुद्धीचा व चातुर्यचा  उपयोग केल्याशिवाय राहवे ही मोठी अन्यायची  गोष्ट  आहे. आता ज्या  वेदांच्या योगाने ईश्वराविषयी व मनुष्यविषयी कसे वागावे व शास्त्र व कलाकौशल्याच्या योगाने आपल्या आयुष्याचा  क्रम  या जगात चांगल्या रीतीने घालविता यावा (असे जर त्यात आहे ) तर तो आपल्यापासी बळकावूनबसने हे किती  क्रूर कर्म आहे ?  

४. परन्तु इतकेच नाही, आम्हा गरीब मांग महारास हाकून  देवून आपन मोठमोठ्या इमारती बाधुन हे लोक बसले व त्या इमारतीच्या पायात आम्हास तेल शेंदुर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा क्रम चालविला होता. आम्हा मनुष्यास  ब्राह्मण लोकनी   गाई म्हशी  पेक्षा नीच मांनिले आहे. सांगते, एका. ज्या  वेळी बाजीरावांचे राज्य होते त्या  वेळी आम्हास गाढ़वाप्रमाणे  तरी  मानित होते कि काय ? पाहा बरे, तुम्ही लंगड़या  गाढ़वास मारा बरे, त्याचा धनी तुमची फटफजीती  करून  तरी राहील कि काय ? परन्तु मांग महारास मारु नका असे म्हणणारा कोण होता  बरे ? त्या समयी मांग अथवा महार यातून कोणी तालिमखान्यापढून  गेला असता गुलटेकडीच्या मैदानात  त्यांच्या शिराचा  चेंडू आणि तलवारीचा दाडू करून खेळत होते. असी  जर मोठ्या सावळ्या  राजाच्या दारावरून जाण्याची बंदी तर मग विद्या शिकण्याची मोकळिक  कोठून मिळणार  ? कदाचित कोणास वाचता आले व बाजिरवास कळले तर तो म्हणे, कि हे महार मांग असून वाचतात,  तर ब्राह्मणानी  का त्यास  दप्तरदारचे  काम देवून त्यांच्या ऎवजी धोकटया  बगलेत  मारून विधवांच्या हजामती करीत फिरावे कि काय ? असे बोलून तो त्यास  शिक्षा   करावी.

५.  दूसरे असे कि लिहिण्याचीच बंदी करून ते लोक थांबले कि काय ? नाही बाजीराव साहेब तर काशिस जावून धुळीत  सहवासी होवून तद्रूप झाले, पण  त्यांच्या सहवासाच्या गुनाणे  येथील महार तो काय पन तोहि माँगा च्या  सावलीच्या स्पर्श होवू नये  म्हणून प्रयत्न करीत आहे. सोवळ  नेसून  नाचत फिरणारया लोकांचा एवढा  च  हेतु कि काही लोकांपेक्षा आम्ही पवित्र आहो असे मानने व् त्यापासून त्यास  सुख वाटणे, पण  एका  शिव न्याच्या  बंदीपासून आम्हांवर किती  दुःखे  पडतात याचा या निर्दयांच्या अंतकरणास द्रव येतो कि काय ? याच कारणांमुळे आम्हास कोणी चाकरीत ठेवीत नाहीत. जर चाकरी मिळण्याची एवढी बंदी तर आम्हास कोणी पैसा कोठून मिळणार  ? बर हे उघडच  सिद्ध होते कि आमचे हाल फार होतात पंडित हो, तुमचे स्वार्थी, आपलपोटे,  पांडित्य, पूजेसाहित एकीकडे गुंडाळून ठेवा आणि मी सांगते याजकडेस लक्षपूर्वक कान दया. ज्यावेळेस आमच्यातल्या स्त्रिया बाळत्  होतात, त्यावेळेस त्यांच्या घरावर  छप्पर सुधा नसते, म्हणून हिव, पाउस व् वारा यांच्या उपद्रवमुळे त्यास  किती  दुःख  होत  असेल बरे ! याचा विचार स्वतांच्या अनुभवांवरून  करा जरा एखाद्या वेळेस त्यास बाळंत  रोग झाला तर त्यास औषधांचा व वेधास पैसा कोठून मिळणार  ? अस्सा कोणता तुम्हा मधे सम्भावित वैद्य होता, कि त्याने लोकास फुकट औषध दिली ? 

६ मांग महारा च्या मुलास ब्रहाह्मणादिकांच्या मुलानी दगड़  मारून  रक्त निघाले तर ते सरकरात जात  नाहीत. ते म्हणतात, कि आपणास उच्चिष्ठ आनायास जावे लागते.  असे म्हणून उगिच राहतात. 
      हाय हाय, काय रे भगवान हे दुःख ! हा जुलुम विस्तराने लिहू लागले तर मला रडू  येते. या कारणास्तव भगवंताने आम्हांवर कृपा करून दयाळु  इंग्रज सरकारास इथे पाठविले, आणि आता या राज्यातून आमची जी दुःख निवारणी झाली ती  अगरक्रमा ने पु ढे  लिहिते 

      शुरपना  दाखविणारे व् गृहात उंदीर मारणारे असे जे गोखले आपटे,त्रिकमजी, आंधळा, पांसरा, काळ,  बोहार इत्यादि मांग महारांवर स्वारया  घालून विहिर भरित होते, व गरोदर बायकांसाहि देहांत शासन करीत होते, ती  बंदी झाली  आणि पुणे प्रांती मांग महारांचे कल्याण करणारे दयालु बाजीराव महाराजांच्या राज्यात असि अंधाधुंधी होती, कि ज्याच्या मनास वाटेल त्याने मांग महारांवर नाना प्रकारची तूफ़ाने घेवून शेंदाड़ शिपायासारखा जुलुम करीत होते, ती  बंदी झाली (किल्ल्याच्या ) पायात घालण्याची बंदी झाली. आमचा वंश ही वाढत चालला मांग महार यातून कोणी बारीक पांघरूण पांघरले असता, ते म्हणत कि याने चोरी करुण  आणिले हे पांघरूण तर ब्राह्मणानिच पांघरावे जर मांग महार  पाघरतील तर धर्म भ्रष्ट होईल असे म्हणून त्यास बांधून मारित, पण  आता इंग्रजांच्या राज्यात ज्यास पैसा मिळेल त्याने घ्यावे उंच वर्णातील लोकानी (चा ) अपराध केला असता मांगाचे किंवा महारांचे डोके मारित  होते ती  बंदी झाली. जुल्मी बिगारी गेली अंगाचा स्पर्श होवू देण्याची मोकळीक कोठे कोठे झाली. गुलटेकडीच्या मैदानात चेंडू डांडू खेळण्याची बंदी झाली बाजारात फिरण्याची मोकळीक झाली. 
       अहो वर सांगितल्याप्रमाणे दया करणारे बंधुजन हो अजुन तरी  सांभाळा थोडासा तरी स्वदेशीय या महान दुःखाच्या सागरातून बाहेर काढण्याचा अभिमान धरा, निरभिमानी असा परमेश्वरा ने एक ही प्राणी उत्पन्न केला नाही परन्तु तुमच्या मनातील अभिमान कोणत्या सैताना ने काढून नेला असेल तो नेउ पाहा बी रे ! तुम्ही कावळा च्या जाती कड़े लक्ष्य दया त्यांचे वर्णन करताना मला मोठे आश्चर्य वाटते कि परमेश्वराने कावल्यास खोड  (अंगस्वभाव ) दिली आहे पण ते खोडीचा उपयोग सन्मार्गकडे करतात परन्तु मनुष्यवर किती  ईश्वराची प्रीती  कि मनुष्यस बुद्धि  म्हणून जी काही अमोलिक वस्तु दिली आहे तिचा ते उपयोग सन्मार्गक डे  करीत नाहीत परन्तु सर्वच करीत नाहीत अस नाही काही मनुष्ये उपयोग करतात अस्तु या दोहींचि तुलना करताना मुर्ख कोण व् शहाणा कोण या विषयी मी सांगत नाही 
         आता निपक्षपाती  दयाळु  इंग्रज सरकारचे राज्य झाल्यापासून एक चमत्कारिक गोष्ट  झाली ती  लिहिताना मला मोठे आस्चर्य   वाटते ती  अशी कि जे ब्राह्मण पूर्वी आम्हास सांगितल्याप्रमाणे दुःख देत  होते, तेच  आता माजे  स्वदेशीय प्रिय मित्र बंधू आम्हास या महान दुःखातून बाहर काढण्याविषयी रात्रदिवस सतत मेहनत घेतात परन्तु सर्वच ब्राह्मण घेतात असे  नाही त्यां तुन ज्यांचा विचार सैतानानी नेला आहे ते पूर्वीसारखा आमचा द्वेष करतात आणि जे माज़े प्रिय बंधू आम्हास बाहर काढण्याविशयी प्रयत्न करतात त्यास  म्हणतात जाती बाहेर टाकू.
        आमच्या प्रिय बंधूनी  मांग महारांच्या मुलांच्या शाळा  मांडल्या  आहेत व या शाळांना दयालु इंग्रज सरकारही मदत  करतात, म्हणून या मांडलेल्या शाळाना  फारच  सहाय आहे. अहो दरिद्राणी व् दुःखानि  पिडलेले मांग महार लोक हो, तुम्ही रोगी आहात,  तर तुमच्या बुद्धीला द्यानरूपी औषद दया,  म्हणजे तुम्ही चांगले दयानी होवून तुमच्या मनातील कुकल्पना जावून  तुम्ही नीतिमान व्हाल ,तर तुमच्या रात्रदिवस  ज्या  जनवाराप्रमाणे हजरया घेतात त्या  बंद होतील तर आता अभ्यास करा म्हणजे तुम्ही दयानी व्हाल कुकल्पना करणार नाही,  परन्तु हेही  सिद्ध करवत  नाही यास उदाहरण जे शुद्ध शाळेत शिकलेली पटाईत  सुधारलेले म्हणवतात,  ते  पन एखाद्या  वेळेस  रोमांच  उभे राहण्याजोगे वाइट काम करतात मग तुम्ही तर मांग महारच आहात 


                                                                                                                        - मुक्ताबाई 
  









         साहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे

आज (१ ऑगस्ट) साहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे यांचा ९४  वा जन्मदिवस त्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा... अण्णाभाऊ साठे जयंती दीन हाच मराठी भाषा दिन !!

                मातंग पंचायतन संघ -महाराष्ट्र राज्य 



 

तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिलं जातं. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे.



श्रेष्ठतेच्या कल्पनेतून हिंदू धर्माचे सुकाणू असलेल्यांनी आपल्याच समाजबांधवांना हजारो वर्षे गावाबाहेर ठेवले. त्यांच्याकडून स्वच्छतेची कामे करून घेताना त्यांना मात्र कायम अज्ञानात आणि अस्वच्छतेत ठेवले. सगळ्याच संधी नाकारलेल्या समाजात जन्मलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी अक्षरशः मिळेल ते काम केले. कुठल्याही शाळेत न जाता ते स्वतःच्या क्षमतेवर शिकले. अनेक कादंबऱ्या, नाटके, कथा लिहिल्या. लहानपणी सांगली जिल्ह्यातील वाटेगावपासून मुंबईपर्यंत चालत आलेल्या अण्णांनी नंतर केवळ कर्तृत्वावर रशियाचा प्रवास केला. दलित समाजाला जागृत करण्याचे मोठे कार्य त्यांनी केले.

 

अण्णाभाऊ यांचे बालपण-




वैयक्तिक दु:खांचा विचार न करता; आपले  विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर. शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणजे जातिभेदांमुळे, जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व. त्यांच्या जातीवर ब्रिटिशांनी गुन्हेगार जात म्हणून शिक्का मारलेला असल्याने त्यांचं बालपणीचं जीवन हे काही प्रमाणात भटक्या अवस्थेत गेलं. त्या काळातील कुरुंदवाड संस्थानातील १ ऑगस्ट १९२० वाटेगाव ता.वाळवा जि सांगली येथे त्यांचा जन्म झाला. वर्चस्व आणि श्रेष्ठत्वाच्या कल्पनेतून हिंदू धर्माने काही जातींना गावाच्या बाहेर ठेवले होते. अशाच वस्तीतील एका छपरात अण्णांचा जन्म झाला. अण्णाची आई वालुबाई भाऊराव साठे आणि घरातील मोठे लोक दोर वळण्याच्या कामाला जात. त्यांचे वडील भाऊराव सिद्धोजी साठे पोटापाण्यासाठीच मुंबईत राहत असत. त्यामुळे लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तुकारामांवर (अण्णांचे मूळ नाव) म्हणजेच अण्णाभाऊंवर होती. अण्णांचे वडील भाऊराव सिद्धोजी साठे हे माळी आणि उत्तम शेतीतज्ञ होते.



परिसरात कुठेही दरोडा पडला किंवा चोरी झाली की पोलिस लगचे अन्नाभाऊच्या वस्तीत येऊन लोकांची धरपकड करायचे. अशा वेळी घरातील पुरुष-बायका दिवस दिवस डोंगरात जाऊन लपायचे. खालच्या जातीतील म्हणून गावात कुणाला शिवायचे नाही, हातात हात मिळवायचा नाही, हे अण्णांनी लहानपणीच पाहिले. अनुभवले. अगदी वर्गातही त्या काळी प्रत्येक जातीची मुले वेगवेगळी बसत. त्यामुळे अण्णांनी एक दिवस वडिलांना विचारले...



"तुमच्या मबईत जातीची शिवाशिव आहे का" ?? वडील म्हणाले, "व्हय.... चहाच्या हॉटेल मालकांनी फुटक्‍या कपबशा बाहेर ठीवल्या आहेत. त्यातच आपल्या जातीची माणसं बाहेर बसून च्या पेत्यात. तसं बघाय गेलं तर आम्हाला कोनीच वळखत न्हाय, पन ह्यो जुना रिवाज हाय म्हनून आम्ही आपलं बाईर बसून पेतो. उगीच कोनाची खटखट नको म्हनून. इंग्रज सायेबाकडं ही शिवाशिव नसती. मी त्येंच्याकडं माळीकाम करायला गेलो म्हंजी ते मला तेंच्याच कपात च्या देत्यात. तेंच्याकडे एकच माणसाची जात. आमची माणसं नस्ती आडगी. म्हनूनच इंग्रज आमच्यावर राज्य करत्याती. अन्‌ आमी एका देशाचं असून आम्ही एकमेकाला शिवून घेत न्हाय.”
 

वडील भाऊराव मुंबईत माळी काम करून गावाकडे असणाऱ्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत. मुंबईत राहत असल्यामुळे शिक्षणाचे महत्त्व त्यांना समजले होते. त्यामुळे आपल्या मुलांनी शिकावे, असे त्यांना वाटे. त्यांच्या आग्रहामुळेच वयाच्या १४ व्या वर्षी अण्णांनी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. 


गावाकडे आल्यावर एके दिवशी त्यांनी अण्णाला शाळेत घातले. त्या वेळी त्यांचे वय थोडे जास्तच होते. शाळेत गेल्यावर दुसऱ्याच दिवशी गुरुजी त्याच्यावर संतापले. ते म्हणाले, कालपासून ही चारच अक्षरे तू गिरवतो आहेस, तरी तुला ती नीट लिहिता येत नाहीत. त्यावर अण्णांनी त्यांना आपण कालच शाळेत आलो असल्याचे आणि मन लावून शिकणार असल्याचे सांगितले. पण गुरुजींनी त्याला मारायचे ठरवले होते. घोड्याएवढा झाला आहेस आणि अक्षर काढता येत नाही, असे म्हणत मास्तरांनी अण्णांची उजव्या हातची बोटे सुजेपर्यंत मारले. दुसऱ्या दिवशी अण्णांनी वर्गात येऊन गुरुजींच्या अंगावर मोठा धोंडा टाकला. त्यामुळे गुरुजी कोलमडले आणि विद्यार्थ्यांना सांगू लागले, पकडा त्या तुक्‍याला. पण तोपर्यंत अण्णा घरी पोचले होते. दुसऱ्या दिवशी मास्तरांनी गावातील पंतांकडे तक्रार केली. पंतांनी अण्णा आणि त्यांच्या वडिलांना बोलवून घेतले. बरोबर अण्णांचे मामा फकिरा हे देखील आले होते. पंतांनी अण्णांची सुजलेली बोटे पाहिली. ते म्हणाले...,



"गुरुजी, तुम्हाला मुलं आहेत की नाही ?? गरिबाच्या पोराला तुम्ही एवढे मारले. स्वता:च्या पोराला एवढे मारले असते का ?? अण्णांचे मामा फकिरा म्हणाले... जर तुम्ही गावातील दुसऱ्या कोणत्या पोराला एवढे मारले असते तर तुम्हाला गावातून पळून जावे लागले असते." गुरुजी त्यावर काही बोलले नाहीत. तेव्हा फकिरा त्यांना म्हणाले, "गुरुजी इंग्रजांनी आम्हाला गुन्हेगार ठरवलं म्हणून तुम्ही ठरवू नका... पोराला नीट शिकवा. नायतर भलतंच व्हईल." गुरुजी गरिबांच्या मुलांना दूर लोटू नका. उद्या शिकून ह्याच तुक्‍याचा तुकाराम होईल आणि विमानातून इंग्लंड अमेरिकेला जाईल. तो शिकला पाहिजे.”



परंतु तत्कालीन मागास जातींतील मुलांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा होत्या. अण्णाभाऊ पहिल्यांदा वाटेगावच्या शाळेची पायरी चढले; पण शिक्षकांच्या निर्दयी मारामुळे दोन दिवसांतच त्यांनी शाळेचा धसका घेऊन शाळेकडे कायमचीच पाठ फिरवली. त्या मुलांशी शिक्षकांचे वर्तनही निर्दयीपणाचे होते. वाढलेले वय, सदोष शिक्षण पद्धती यांमुळे अण्णा फार दिवस शाळेत गेलेच नाहीत.



 
लहानपणापासूनच अण्णाना विविध छंद होते. मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढीजात वारसा असल्याने दांडपट्टा चालविण्यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हते. अण्णाभाऊंच्या बालपणातल्या घडणीमध्ये त्यांच्या मूलभूत आवडींचा वाटा जास्त आहे. गर्दीपासून दूर असे डोंगर, दर्या, राने, नद्या या ठिकाणी भटकणं त्यांना आवडे. त्यातूनच पक्षिनिरीक्षण, शिकार करणं, मध गोळा करणं हे छंद त्यांना जडले. याशिवाय जंगलात एकटे भटकणे, पोहणे, मासेमारी, शिकार करणे, विविध पक्षांशी मैत्री करणे, जंगलातील पानाफुलांमधील सूक्ष्म फरक शोधणे असे एक ना अनेक छंद त्यांना होते. या छंदांमध्ये निरागसपणे बागडण्यातच त्यांचे बालपण गेले. मोठे होत असताना त्यांच्या आवडींमध्ये वाढच होत होती. जत्रांमध्ये जाऊन तिथल्या गोष्टींचं निरीक्षण करणंही त्यांच्या आवडीचं एक काम होतं. त्यात नंतर हळूहळू पाठांतराची भर पडत गेली. लोकगीतं, पोवाडे, लावण्या पाठ करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकणं आणि इतरांना सांगणं या त्यांच्या छंदातून त्यांच्याभोवती समवयीन मुलांचा गोतावळा जमत असे. शिवाय मैदानी खेळांचा वारसा मिळाल्यामुळे दांडपट्टा चालवण्यातही ते प्रवीण होते. लोकगीते पाठ करून ती टिपेच्या आवाजात म्हणणे, पोवाडे, लावण्या पाठ करणे, इतरांना त्या आत्मीयतेने म्हणून दाखवणे या छंदांमुळे त्यांच्याभोवती नेहमीच मित्र-मंडळी जमलेली असत. 

 

अण्णांनी स्वातंत्र्य चळवळीत उतरण्याची प्रेरणा -

 

 

रेठ्या या गावाच्या जत्रेत क्रांतिसिंह नाना पाटलांनी भाषण संपवले आणी अचानक या भाषणसभेत ईग्रंज येऊ लागले लोकांना हाकलु लागले आणि क्रांतिसिंह नाना पाटलांना पकडण्यासाठी त्याच्यां मागे पळू लांगली... क्रांतिसिंह नाना पाटील हे जंगलातुन घोड्यावरुण पळ काढु लांगले क्रांतिसिंह नाना पाटीलांनी मागे वळूण पाहीले तर एक मुलगा त्याचा पाठलांग करत आहे. क्रांतिसिंह नाना पाटील थांबले त्यांनी त्या मुलांला विचारले कारे माझ्या पाठीमागे पळत कां येत आहे तो धाडसी बालक म्हणाला मी पाठलाग नाही तुम्हाला रस्ता दावीत आहे... त्या धाडसी बालकांचे नाव होते "अण्णा भाऊ साठे". रेठर्‍याच्या जत्रेत अण्णांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले आणि अण्णांभाऊंना स्वातंत्र्य चळवळीत उतरण्याची प्रेरणा देऊन गेलं. 



चळवळीत सामील होऊन लोकनाट्यांत छोटी मोठी कामे त्यांनी केली. याच काळात दुष्काळ पडल्याने अण्णांच्या वडिलांनी आपल्या कुटुंबाला मुंबईत न्यायचे ठरविले. एकेका गावात तीन-चार दिवस राहत त्यांच्या हा प्रवास चालू होता. पुण्यापर्यंतचा प्रवास सगळ्या कुटुंबाने चालत केला.  मग पुढे खंडाळ्याचा कोळशाचा कंत्राटदार, कल्याणचा कंत्राटदार यांच्याकडे कष्टाची कामे करत सगळे जण रेल्वेने मुंबईला पोहचले. त्याच वेळी अण्णा भाऊंचे बालपण संपले. वाटेगाव ते मुंबई पायी प्रवास करुन ते मुंबईत आले. पण पुढे १९६३ मध्ये अण्णांनी मुंबई ते मास्को हा प्रवास विमानाने केला. 


कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा अनुयायी बनले-

 




वयाच्या ११ व्या वर्षी अण्णा आपल्या आई-वडिलांबरोबर मुंबईत आले. हे कुटुंब भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत राहायला गेले.  मुंबईतली सुरुवातीची वर्षं ही अण्णाभाऊंसाठी वैचारिक जडणघडणीची ठरली. तिथे चित्रपटापासून विविध राजकीय पक्षांपर्यंतचं मोठं जग त्यांना जवळून पाहायला मिळालं. मुंबईत भायखळ्याला एका चाळीत ते राहू लागले. त्या ठिकाणी अण्णा एका कपडे विकणाऱ्या फेरीवाल्याकडे काम करू लागले. त्याची कपड्याची पेटी डोक्‍यावर घेऊन अण्णा त्याच्यामागे चालत असत. एकदा त्यांची भेट ज्ञानदेव नावाच्या नातलगाशी झाली. ते उत्तम कलावंत होते. अण्णांनी त्यांच्याशी जवळीक वाढवली आणि ते त्यांच्या वरळीच्या घरी जाऊ लागले. तिथे ते ज्ञानदेवच्या तोंडून रामायण, हरिविजय, पांडवप्रताप हे ग्रंथ ऐकत. फक्त ऐकून त्यांनी हे ग्रंथ तोंडपाठ केले. पुढे आपोआप अक्षरओळख झाली. या एक वर्षात त्यांनी कोणतेही काम केले नाही. फक्त एकच ध्येय ठेवले शिकण्याचे. विविध राजकीय संघटनांचे ध्येय ब्रिटिशांना हाकलून देणे हेच होते. परंतु प्रत्येकाची विचारसरणी वेगळी होती. यांपैकी कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा अनुयायी बनले. पक्षाच्या सभांचे आयोजन करणे, वॉलपेंटिंग करणे, हॅण्डबिले वाटणे, मोर्चे काढणे, छोट्या-मोठ्या सभेसमोर गोष्टी सांगणे, पोवाडे, लोकगीते म्हणून दाखविणे या सर्व गोष्टींमुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते सर्वांना एकदम हवेहवेसे झाले. याच वेळी त्यांच्या तुकाराम या नावाचे अण्णा या नावात रूपांतर झाले. गरिबी अनुभवलेल्या अण्णाभाऊंची कम्युनिस्ट विचारप्रणालीशी जवळीक झाली. मुळातच कार्यकर्ता व्यक्तिमत्त्वाचे तरुण अण्णा अंगभूत गुणांमुळे कम्युनिस्ट चळवळीतल्या कार्यकर्त्यांमध्ये सहजपणे मिसळून गेले त्या काळी मुंबईत स्वस्ताई असल्याने सुरुवातीचा काळ सुखाचा गेला. मुंबईत फिरताना दोन गोष्टींकडे ते आकर्षिले गेले, एक म्हणजे विविध राजकीय संघटना आणि दुसरे म्हणजे मूक चित्रपट.




मुंबईत पोटासाठी वणवण भटकत असताना अण्णांनी हमाल, बूट पॉलीशवाला, घरगडी, हॉटेल बॉय, कोळसे वाहक, हमाली, वेटर, घरगडी, डोअरकीपर, कुत्र्याला सांभाळणारा, मुलांना खेळविणारा, उधारी वसूल करणारा, खाण कामगार, ड्रेसिंगबॉय , मुलांना खेळवणं, अशी नाना प्रकारची कामे केली. यावरून त्यांच्या कष्टमय जीवनाची आपल्याला कल्पना येते. या काळातच त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद लागला. या छंदानेच त्यांना साक्षर बनविले. चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डवरील अक्षरे जुळवित ते साक्षर झाले. या अक्षर ओळखीनंतरच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.



वयाच्या १७-१८ व्या वर्षी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अण्णांवर आली होती. वडील थकल्यावर त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली. नंतर ते माटुंग्यातील चिरागनगर एका झोपडीत राहायला आले. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली. ते म्हणायचे, 'आपण गलिच्छ वस्तीत रहात असलो तरी आपलं मन स्वच्छ असावे'. अण्णाभाऊ साठे यांना लोकांनी एकदा  विचारले, ''तुमच्या झोपडीचे दार लहान का?'' यावर अण्णाभाऊ म्हणाले, ''पंडित नेहरू जरी माझ्या झोपडीत आले तरी त्यांना वाकूनच यावे लागेल !!''अण्णाभाऊ कोहिनूर मिलमध्ये काम करू लागले. तिथेच त्याचा कामगार चळवळीशी संबंध आला. सभा, मिरवणुका अशा कार्यक्रमात ते भाग घेऊ लागले. ऐतिहासिक पोवाडे म्हणू लागले. त्यांच्या खणखणीत आवाजाला लोकांकडूनही दादही तशीच मिळे. ते जे पाहत ते लगेच आत्मसात करण्याची अनोखी क्षमता त्यांच्यात होती. त्यामुळे ते बासरी वाजवायला शिकले. एक दिवस त्यांनी बुलबुल तरंग नावाचे वाद्य आणले आणि त्याचा त्यांना नादच लागला. हे वाद्य ते उत्तम तऱ्हेने वाजवू लागले. ते भजन-गाणी म्हणू लागले. त्यासाठी त्यांनी पेटी आणली आणि ती कशी वाजवायची हे ते काही दिवसातच शिकले. तबला, सारंगी ढोलकी अशी सर्वच वाद्ये ते वाजवत असत. कोहिनूर मिलचा संप झाला. तो सहा महिने चालला आणि गिरणी बंद पडली. परंतु कोहिनूर मिलमधील नोकरी सुटल्याने त्यांच्यावर मोठेच संकट आले. या वेळी पुन्हा साठे कुटुंब वटेगावला आले. 



 
मुंबईतील धकाधकीचे जीवन, मोर्चे, सभा, सत्याग्रह, आंदोलने या सर्व गोष्टी पाहिलेल्या अण्णाभाऊंना वटेगावमध्ये राहणे शक्य होत नव्हते. अत्यंत अस्वस्थतेत त्यांनी घर सोडले आणि ते बापू साठे या त्यांच्या चुलत भावाच्या तमाशाच्या फडात ते सामील झाले. अण्णाभाऊंचा धारदार आवाज, त्यांचे पाठांतर, पेटी, तबला, ढोलकी, बुलबुल ही वाद्ये वाजवण्याची कला या गुणांमुळे त्यांचे तमाशात स्वागतच झाले. महाराष्ट्राच्या तमाशा या कलेच्या परंपरेत मातंग समाजाने जी वैशिष्ट्यपूर्ण भर घातली ती शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सहभागानेच. महाराष्ट्रातील लोकांना या वारणेच्या वाघाचे दर्शन पहिल्यांदा तमाशातच झाले. तमाशासारख्या कलेला अधिक प्रसिद्धी, प्रतिष्ठा, व समृद्धी अण्णाभाऊंनीच मिळवून दिली. अण्णाभाऊंना एखाद्या भूमिकेचं आकलन लवकरच आणि चांगलं होत असे. ते ओघवते संवाद उत्तम लिहू शकत. अनेक वाद्यं वाजवण्यात ते तरबेज होते आणि त्यांचं पाठांतरही अतिशय उत्तम होतं. अण्णांचं हे बहुरंगी व्यक्तिमत्त्व तमाशाच्या कलेत खुललं नसतं तरच नवल होतं. त्यांनी तमाशाच्या कलेला लोकनाट्यात रूपांतरित केलं. त्या त्या वेळच्या राजकीय परिस्थितीबद्दल सामान्यांमध्ये जागृती घडवण्याचं मोठं काम पुढे त्यांच्या वगनाट्यांनी केलं. 

 

पहिला विवाह-



अण्णा वाटेगावमध्ये असताना वडिलांचं निधन झाल्यानंतर लवकरच अण्णा भाऊंनी कोंडाबाई या अशिक्षित मुलीशी विवाह केला. त्यांच्यापासून त्यांना एक मुलगाही झाला. मात्र, त्यांच्यासोबतच्या संसारात ते स्थिर झाले नाहीत.




भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळीही त्यांनी जनजागृतीचे प्रचंड काम केले. एक कलाकार म्हणून तसेच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही ते प्रत्येक उपक्रमात, आंदोलनात सहभागी होत असत. चलेजाव चळवळीच्या काळात वटेगावातही बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अनेक घडामोडी सुरू होत्या. अण्णाभाऊ त्यात सामील असल्याने त्यांच्यावर वॉरंट निघाले. परिणामी त्यांनी कायमचे घर सोडले. पुढे त्यांना तत्त्वज्ञानाची, विचारांची एक दिशा मिळत गेली आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. पक्ष कार्यासाठी झोकून दिलेले असतानाच १९४४ साली त्यांनी 'लाल बावटा’ या कला पथकाची स्थापना केली. माटुंग्याच्या लेबर कँपमधील मंडळीं विशेषत: नाशिक, सातारा, नगर जिल्ह्यातून येऊन स्थायिक झाले होते. बहुतेक गिरण्यात, गोदीत, नगरपालिकेत नोकरीला होती. इथेच अण्णाभाऊंची नाळ कम्युनिस्ट पक्षाशी जोडली गेली. याच कँपच्या नाक्यावर `लेबर रेस्टॉरंट’ होते. इथेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अड्डा होता. या रेस्टॉरंटमध्ये आण्णाभाऊंनी डासावर पोवाडा लिहिला होता. टिटवाळा येथे १९४४ साली झालेल्या शेतकरी परिषदेत लालबावटा कलापथकाची स्थापना झाली. इथेच शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ व गव्हाणकर एकत्र आले. या माध्यमातूनच त्यांच्या लिखाणाला सुरुवात झाली. लावण्या, पोवाडे, पथनाट्ये म्हणजे त्यांच्या ललित साहित्याची पूर्वतयारी होती. त्यांनी एकूण सुमारे १५ वगनाट्ये लिहिली व त्यातूनच त्यांना प्रसिद्धीही मिळत गेली.  याच काळात अण्णाभाऊंनी स्वतंत्रपणे लेखन करण्यास सुरूवात केली. त्यांचा स्तालिनग्राडचा पोवाडा त्या वेळी कामगारांमध्ये खूपच लोकप्रिय झाला होता. त्यांच्यातला कलाकार बाहेर आणण्यासाठी हे पथक चांगलंच निमित्त ठरलं.



१९४५ च्या दरम्यान मुंबईत अण्णांच्या आयुष्याला काहीशी स्थिरता लाभली. लोकयुद्ध साप्ताहिकात वार्ताहराचे काम करीत असताना त्यांनी अकलेची गोष्ट, खापर्‍या चोर, माझी मुंबई अशी गाजलेली लोकनाट्ये लिहिली. या काळातच संत साहित्यासह अनेक प्रतिभावंतांच्या अभिजात कलाकृती त्यांनी वाचून काढल्या. वैचारिक आणि कलाविषयक वाचनाची समृद्ध लेखक व्हायला त्यांना मदत झाली. अण्णांचे लेखक म्हणून यशाचे रहस्य म्हणजे त्यांनी नेहमी सामान्य वाचकाच्या मनाची व्यथा मांडली. सामान्य वाचकालाच प्रमाण मानल्याने वस्तुनिष्ठ असलेले त्यांचे साहित्य वाचकांच्या गळ्यातील ताईत बनले.





१९५० ते १९६२ हा त्यांचा साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. याच काळात त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्ती निघाल्या. प्रचंड यशस्वी होत असताना त्यांचे स्वत:चे जीवन मात्र धकाधकीचे होत होते. मुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागले. अण्णांनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली. 
 


अण्णाभाऊचे साहित्य-

 

  

अण्णाभाऊंच्या साहित्यात ग्रामीण, दलित, महिला या समाजातल्या शोषित वर्गांचं अनुभवाधिष्ठित चित्रण आढळतं. ना.सी. फडके आणि वि.स. खांडेकर यांचा प्रभाव असणाऱ्या मराठी कादंबरीच्या त्या काळात जेव्हा शहरी आणि उच्चवर्गीयांचंच प्रतिनिधित्व होत होतं, तेव्हा अण्णाभाऊंनी कनिष्ठ आणि ग्रामीण जनतेचं विश्व साहित्यात आणलं. साहस या गुणाचं चित्रण त्यांच्या अनेक कादंबऱ्यांतून आढळतं. ‘फकिरा’ या त्यांच्या सर्वाधिक प्रसिद्ध कादंबरीत त्यांनी आपले खऱ्या आयुष्यातले मामा फकिरा राणोजी मांग यांची साहसी जीवनकथा मांडलेली आहे, फकीरा  ही पुढे अतिशय गाजलेली कादंबरी त्यांनी डॉ. बाबासाहेब  आंबेडकरांच्या  झुंजार लेखणीला अर्पण केली. तर ‘वारणेच्या खोऱ्यात' या कादंबरीत स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करणारा तरुण आणि त्याच्या प्रेयसीची कथा आहे.




'कार्यकर्ते लेखक' असं अण्णाभाऊंना म्हटलं गेलं, कारण आपल्या साहित्याला त्यांनी सामाजिक चळवळींशी जोडलं. सामान्य कष्टकरी लोकांशी असलेली त्यांची बांधिलकी त्यांच्या साहित्यातून आणि कार्यातून दिसते. त्यांनी 'वैजयंता' या स्वतःच्या कादंबरीच्या प्रस्तावनेत आपली लेखनभूमिका अण्णाभाऊनी विषद केली आहे, ती अशी....



"जो कलावंत जनतेची कदर करतो त्याचीच जनता कदर करते हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करीत असतो. माझा माझ्या देशावर, जनतेवर आणि  तीच्या संघर्षावर अढळ विश्वास आहे. हा देश सुखी, समृद्ध नि सभ्य व्हावा, इथे समानता नांदावी, या महाराष्ट्रभूमीचे नंदनवन व्हावे अशी मला रोज स्वप्ने पडत असतात. ती मंगल स्वप्ने पहात पहात मी लिहीत असतो. केवळ कल्पकतेचे कृत्रिम डोळे लावून जीवनातील सत्य दिसत नसते. ते सत्य ह्रदयानं मिळवावे लागते. डोळ्यांनी सर्वच दिसते. परंतु ते सर्व साहित्यिकाला हात देत नाही. उलट दगा मात्र देते. 




माझा असा दावा आहे, की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलीतांच्या, शोषितांच्या, कामगारांच्या तळहातावर तरली आहे. त्या शोषितांचे जीवन तितक्याच प्रामाणिक हेतूने नि निष्ठेने मी चित्रित करणार आहे नी करीत आहे."



अण्णांनी वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, फकिरा अशा अनेक कादंबर्‍या लिहिल्या. ३०० च्या वर कथा लिहिल्या. खुळंवाडी, बरबाह्या कंजारी, कृष्णाकाठच्या कथा असे त्यांचे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्टॉलीनग्राडचा पोवडा, महाराष्ट्राची परंपरा, मुंबईचा कामगार असे पोवाडेही लिहिले. निवडणुकीत घोटाळे, दुष्काळात तेरावा, अकलेची गोष्ट ही त्यांची वगनाट्ये प्रसिद्ध आहेत. दोनशे-अडीचशे गाणी, लावण्या त्यांनी लिहिल्या आहेत. कामगारांमध्ये त्यांची गाणी आणि लावण्या लोकप्रिय आहेत. शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर आणि अण्णाभाऊ साठे या तिघांनी १९४१, १९४२ मुंबई शहरावर अधिराज्य गाजविले. याच काळात बंगालमध्ये दुष्काळ पडला होता. त्यावर अण्णांनी `बंगालची हाक’ हा पोवाडा रचला. संयुक्त महाराष्ट्रलढ्यात त्यांनी कामगार जागा करुन त्यांची एकजूट संघटना निर्माण केली. 

पुरोगामित्वाची परंपरा.. शिवरायवंदन-




 
अण्णाभाऊ हे आपल्या कार्यक्रमाची सुरवात एखाद्या देवाचे नाव न घेता छत्रपती शिवरायांच्या नावाने करायचे... तमाशात पारंपारिक श्रीगणेशा... अण्णांनी तमाशाला नवेरुप दिलं. पहिल्या नमनात मातृभूमी हुतात्मे, राष्ट्रपुरुष यांचा समावेश झाला, गणातील कृष्ण आणि गवळणी त्यांनी काढूनच टाकल्या. लावणी व तमाशा लोकशिक्षणाकडे वळविण्याचे श्रेय अण्णाभाऊंकडेच जाते. गवळण  झिडकारून 'मातृभूमिसह' 'शिवरायांना वंदन' करण्याची परंपरा अण्णाभाऊनी रुजवली ती अशी.... 
  

"प्रथम मायभूमीच्या चरणा |
छत्रपती शिवाजी चरणा |
स्मरोनी गातो कवणा || "


अण्णाभाऊंनी आपल्या पुरोगामी-समतावादी, वैज्ञानिक विचारांनी पारंपरिक, पौराणिक तमाशाच्या गण-गवळण ढाच्यातही (form) आमूलाग्र परिवर्तन केले. तमाशाच्या प्रारंभी होणाऱ्या गणेश वंदनालाही त्यांनी फाटा दिला आणि प्रथम वंदू भूचरणा व छत्रपती शिवाजी राजासारख्या शूर पुरुषाला वंदन केले. थोडक्यात त्यांनी देवाऐवजी माणसाला वंदन करण्याची नवी प्रथा पाडली. तमाशात गवळणींची जी अश्लील भाषेत टिंगल-टवाळी चालायची तिलाही त्यांनी काट दिला. अण्णा भाऊंनी महात्मा फुल्यांच्या सत्यशोधकी जलसा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील आंबेडकरी जलसाची जनप्रबोधनाची क्रांतिकारी परंपरा नव्या लोकनाटय़ातून पुढे नेली. त्यांनी मराठी व भारतीय साहित्य-संस्कृतीच्या उच्चभ्रू पांढरपेशी कक्षा रुदावल्या. त्यामुळे अण्णा भाऊंचे साहित्य इंग्रजी,  रशियन, फ्रेंच, झेक आदी जागतिक भाषांतही अनुवादित झाले. मराठीतील ज्येष्ठ साहित्यक व दलित साहित्याचे प्रवर्तक बाबुराव बागूल यांनी अण्णा भाऊंची तुलना सुप्रसिद्ध रशियन साहित्यिक मॅक्झिम गॉर्की यांच्याशी केली आणि 'महाराष्ट्राचा मॅक्झिम गॉर्की' असा गौरव केला.
 


अण्णांभाऊंनी लिहिलेली ‘मुंबईची लावणी’ ही त्या काळात खूप गाजली. मुंबईचं विविधांगी रूप, त्या शहरातली गरिबी आणि श्रीमंती यांच्यातली विसंगती त्यांनी त्यात टिपली आहे.  अण्णांनी मुंबईची लावणी लिहून वास्तववादी भीषण अशा मुंबईच्या विषमतेचे दर्शन घडविले. उदाहरणार्थ,



मुंबईत उंचावरी । मलबार हिल इंद्रपुरी ।
कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती ।।
परळात राहणारे । रातदिवस राबणारे ।
मिळेत ते खाउनी घाम गाळती ।।१।।
ग्रॅंट रोड, गोखले रोड । संडास रोड, विन्सेंट रोड ।
असे किती रोड इथं नाही गणती ।।
गल्ली बोळ किती आत । नाक्यांचा नाही अंत ।
अरबी सागराचा वेढा हिच्या भोवती ।।२।।
आगीनगाडी मोटारगाडी । विमान घेतं उंच उडी ।
टांग्यांची घोडी मरती रस्त्यावरती ।।
हातगाडी हमालांची | भारी गडबड खटा-यांची ।
धडपड इथं वाहतुकीची रीघ लागती ||३||

 

फाळणीच्या पार्श्वभूमीवर ते कळवळून अण्णाभाऊ सांगतात....



"द्या फेकून जातीयतेला । करा बंद रक्तपाताला । आवरोनी हात आपुला । भारतियांनो इभ्रत तुमची ईषेला पडली । काढा नौका । देशाची वादळात शिरली । धरा आवरुन एकजुटीने दुभंगली दिल्ली । काढा बाहेर राष्ट्रनौका ही वादळात गेली।"
 


अण्णाभाऊ साठे याची लोकप्रिय गीतरचना....


"माझी मैना गावावर राहिली !"

माझी मैना गावावर राहिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||

ओतीव बांधा | रंग गव्हाला |

कोर चंद्राची | उदात्त गुणांची |
मोठ्या मनाची | सीता ती माझी रामाची |

हसून बोलायची | मंद चालायची |
सुगंध केतकी | सतेज कांती |
घडीव पुतली सोन्याची | नव्या नवतीची |
काडी दवन्याची |रेखीव भुवया |
कमान जणू इन्द्रधनुची | हिरकणी हिरयाची

काठी आंधल्याची | तशी ती माझी गरीबाची|
मैना रत्नाची खाण | माझा जिव की प्राण |
नसे सुखाला वाण |
तिच्या गुणांची छक्कड़ मी गयिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||


गरिबीने ताटतुट केलि आम्हा दोघांची |
झाली तयारी माझी मुम्बैला जाण्याची |
वेळ होती ती भल्या पहाटेची |
बांधाबांध झाली भाकर तुकड्याची |
घालवित निघाली मला
माझी मैना चांदनी शुक्राची |
गावदरिला येताच कली कोमेजली  तिच्या मनाची |
शिकस्त केलि मी तिला हसवण्याची |
खैरात केली पत्रांची | वचनांची |
दागिन्यांन मडवुन काडयाची |
बोली केली शिंदेशाही तोड्याची |
साज कोल्हापुरी | वज्रटिक |
गल्यात माळ पुतल्याची |
कानात गोखरे | पायात मासोल्या |
दंडात इला आणि नाकात नथ सर्जाची |
परी उमलली नाही कली तिच्या आन्तरिची |
आणि छातीवर दगड ठेवून पाठ धरिली मी मुम्बैची |
मैना खचली  मनात | ती हो रुसली डोळ्यात |
नाही हसली गालात | हात उन्चावुनी उभी राहिली ||
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
या मुम्बई गर्दी बेकरांची |
त्यात भर झाली माझी एकाची |
मढ़ेवर पडावी मुठभर माती |
तशी गत झाली आमची |
ही मुम्बई यंत्राची, तंत्राची, जागनाराची, मरनारांची, शेंदिची, दाढ़ीची,
हडसनच्या गाडीची, नायलोनच्या आणि जोर्जेटच्या तलम साडीची | बुटांच्या जोडीची |
पुस्तकांच्या थडीची | माडीवर माडी | हिरव्या माडीची |
पैदास इथे भलतीच चोरांची |
एतखाऊची | शिर्जोरांची |
हरामखोरांची | भांडवलदाराची |
पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची |
 पर्वा केलि नाही उन्हाची, थंडीची, पावसाची |
पाण्यान भरल खीस माझ |
वान माला एका छात्रिची |
त्याच दरम्यान उठली चलवल
संयुक्त महाराष्ट्राची |
बेलगांव, कारवार, निपानी, गोव्यासह एकभाषिक राज्याची |
चकाकली संगीन अन्यायाची | फ़ौज उठली बिनिवारची |
कामगारांची | शेतकरीयांची |
मध्यमवर्गियांची |
उठला मराठी देश | आला मैदानी त्वेष |
वैरी करण्या नामशेष |
गोळी डमडमची छातीवर सहिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
म्हणे अन्नाभाऊ साठे | घर बुडाली गर्वाची | मी-तू पणाची | जुल्माची | जबरिची |
तस्कराची | निकुम्बलीला कत्तल झाली इन्द्रजिताची |
चौदा चौकड्याच राज्य गेले रावनाचे | लंका जलाली त्याची | तीच गत झाली कलियुगामाजी
मोरारजी देसायाची आणि स.का. पाटलाची | अखेर झाली ही मुम्बई महाराष्ट्राची |
परलच्या प्रल्याची | लालबागच्या लढायची | फौंटनच्या चढ़ाइची |
झाल फौंटनला जंग | तिथे बांधुनी चंग |
आला मर्दानी रंग | धार रक्ताची मर्दानी वाहिली ||
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची | दाखविली रित पाठ भिंतीला लावून लढायची |
पारी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची | गावाकडे मैना माझी | भेट नाही तिची |
तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची | बेलगांव, कारवार, डांग, उम्बरगावावर
मालकी दुजांची | धोंड खंडनीची | कमाल दंडलीची | चिड बेकिची | गरज एकीची |
म्हणून विनवणी आहे या शिवशाक्तिला शाहिराची |
आता वलु नका | रणी पलु नका | कुणी चलू नका |
बिनी मारायची अजुन राहिली | माझ्या जिवाची होतिया काहिली ||


 

वीडीवो- http://www.youtube.com/watch?v=7yGX2esXLw4

 

मराठीतील ग्रामीण, प्रादेशिक, दलित साहित्यावर अण्णाभाऊंचे प्रभुत्व होते. अण्णाभाऊंच्या साहित्याचे हिंदी, सिंधी, गुजराती, उडिया, बंगाली, तमिळ, मल्याळी या भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलीश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमधे भाषांतर झाले आहे. लेखणीचे हत्यार बनवून त्यांनी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ, स्त्रीवादी, लढाऊ अविष्काराचा दीपस्तंभ मराठी साहित्याच्या क्षेत्रात उभा केला. पु.लं. देशपांडे यांनी  त्यांचे ‘तीन पैशाचा तमाशा’ हे नाटक अण्णाभाऊंना समर्पित केले होते.  एवढ्या मोठ्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रसिद्धी मिळत होती. अण्णांच्या १२ कथांवर चित्रपट निघाले. एवढे साहित्य प्रसिद्ध झाले तरी त्यांचे दारिद्रय संपले नाही. लक्ष्मी त्यांना प्रसन्न नव्हती. ते मितभाषी असल्याने व्यावहारिक बाबतीत लोकांनी त्यांचा गैरफायदा घेतला. परंतु चित्रपट सृष्टीतील भालजी पेंढारकर, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर, सुलोचना यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अण्णांवर खूप प्रेम केले. हिंदी चित्रपट सृष्टीतीलही राजकपूर, शंकर, शैलेंद्र, बलराज सहानी, गुरुदत्त, उत्पल दत्त या कलाकारांचे अण्णांवर प्रेम होते. ऑलेगसारखे रशियन कलावंतही अण्णाभाऊंचे मित्र होते. चौदा लोकनाट्यं, 'वारणेचा वाघ', 'वैजयंता', 'फकिरा', 'चित्रा' इत्यादी प्रचंड गाजलेल्या कादंबर्यांसहित सुमारे बत्तीस कादंबर्या आणि बावीस कथासंग्रह अशी विपुल साहित्यनिर्मिती त्यांनी केली. अण्णाच्या अनेक कादंबर्यांनी त्या काळी मराठी चित्रपटसृष्टीला कथांची रसद पुरवली. 'वैजयंता', 'टिळा लावते मी रक्ताचा', 'डोंगरची मैना', 'वारणेचा वाघ', 'फकिरा', आदी प्रसिद्ध चित्रपट त्यांच्या कथा-कादंबर्यांवर आधारित आहेत. त्यांच्या लोकनाट्यांमध्ये 'अकलेची गोष्ट', 'कलंत्री', 'बेकायदेशीर', 'शेटजीचं इलेक्शन', 'पुढारी मिळाला', 'मूक मिरवणूक', 'देशभक्त घोटाळे', 'लोकमंत्र्यांचा दौरा' इत्यादींचा समावेश आहे. १९४९ साली अण्णाभाऊंनी `मशाल’ साप्ताहिकात `माझी दिवाळी` नावाची पहिली कथा लिहिली तिथून त्यांचा साहित्य प्रवास सुरु झाला. जगण्यासाठी लढणार्‍या माणसांच्या अण्णांभाऊंच्या कथा आहेत.असा हा पददलितांच्या जीवनावर वास्तव लिहणारा साहित्यकार सांगली जिल्ह्यात जन्मला होता. 


 अण्णाभाऊचे संयुक्त महाराष्ट्रासाठी योगदान -

 



संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाटये आदींचा समावेश होता. ‘महाराष्ट्राची परंपरा’ (१९५०) ह्या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला; त्याचप्रमाणे मुंबई कुणाची? ह्या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. अकलेची गोष्ट (१९४५), देशभक्त घोटाळे (१९४६), अण्णाभाऊसाठे शेटजींचे इलेक्शन (१९४६), बेकायदेशीर (१९४७), पुढारी मिळाला (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२) ही त्यांची अन्यकाही लोकनाट्ये. अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले. 


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे २ मार्च १९५८  मध्ये झालेल्या दलित साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे... दलित साहित्य संमेलन - २ मार्च १९५८ - उदघाटनपर भाषणातील काही अंश-



माणूस जगतो का ?? नि जगण्यासाठी एवढा धडपडतो का ?? याचा विचार आम्ही करणे जरूर आहे. त्या धडपडणाऱ्या पतिताला आम्ही भित्रा समजतो , तो उंच गगनात गेलेल्या विद्युतमय मनोऱ्यावर उभे राहून विजेच्या तारा जोडतो, खाणीत उभ्या कड्यावर चढून सुरुंगाना पेट देतो किंवा पोलादाच्या रस करणाऱ्या भट्टीवर तो निर्भय वावरतो आणि या सर्व ठिकाणी मृत्यू त्याची वाट पाहत असतो. कधी कधी त्याची व मृत्यूची गाठ पडून हा दलित कष्ट करीत करीत मरण पत्करतो. ही जगण्याची नि मारण्याची आगळी रीत आहे. ती लेखकाने समजून घ्यावी. सुरुंगाना पेट देता देता किंवा पोलादाच्या रसात बुडून मरणे, नाही तर विजेच्या धक्क्याने मरणे, दिवाळे निघाले म्हणून शेअर बाजारात मरणे या मरणातील अंतर लेखकाने मोजून पाहावे नि श्रेष्ठ मरण कोणते ते निश्चित ठरवावे...  दलितातही सर्व भावना इतरांप्रमाणे सदैव जागृत असतात. पण तो इतरांपेक्षा जरा निराळा असतो. कारण तो हाडामांसाचा केवळ गोळा नसतो. तो निर्मितीक्षम असतो. तो वास्तव जगात कष्टाचे सागर उपसून दौलतीचे डोंगर रचतो. अशा या महान मानवावर महाकाव्य रचणारा त्याला हवा असतो...



एका झाडाखाली तीन दगडांची चूल करून मडक्यात अन्न शिजवून दोन मुलं नि बायको यांना जागविणारा हा दलित वरवर कंगाल दिसला तरी त्याची संसार करण्याची इच्छा केव्हाही पवित्र अशीच असते. कुटुंबसंस्थेवरचा त्याचा विश्वास मुळीच ढळलेला नसतो. परंतु त्याची कुटुंबसंस्थाच भांडवलदारी जगाने त्या झाडाखाली हाकलून दिलेली असते. त्याचे आम्ही निरीक्षण करावे, याची कारणपरंपरा शोधावी आणि मग त्या कंगाल दिसणाऱ्याविषयी लिहावे. जपून लिहावे, कारण या समाजाची घडीन घडी त्या दलिताने व्यापवली आहे. अधिक काव्यमय शब्दात बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की, "हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलिताच्या तळहातावर तरलेली आहे". अशा या दलिताचे जीवन खडकातून झिरपणाऱ्या पाझराप्रमाणे असते. ते जवळ जाऊन पाहा. मग लिहा. कारण 'जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे' हे तुकारामाचे म्हणणे खोटे नाही. म्हणून दलिताविषयी लिहिणाऱ्यांनी प्रथम त्याच्याशी एकनिष्ठ असले पाहिजे. तू गुलाम नाहीस , हे जग तुझ्या हातावर आहे, याची जाणीव करून घ्यावी. त्याचे जीवन वरच्या पातळीवर नेण्याची शिकस्त करावी आणि त्यासाठी लेखक हा सदैव आपल्या जनतेबरोबर असावा लागतो. कारण जो कलावंत जनतेबरोबर असतो त्याच्याबरोबर जनता असते. जनतेकडे पाठ फिरवणाऱ्याकडे साहित्यही पाठ फिरवीत असते. जगातील श्रेष्ठ कलावंतांनी वाङ्गमय हा जगाचा तिसरा डोळा मानला आहे. आणि तो डोळा सदैव पुढे व जनतेबरोबर असणे जरूर आहे.

 
(लोकशाहीर अण्णाभाऊ साठे - दलित साहित्य संमेलन- २ मार्च १९५८ उदघाटनपर भाषणातून)

 

अण्णाभाऊंचा रशिया प्रवास-



१९४८, १९६१ साली त्यांनी रशियास जाण्याचा प्रयत्न केला त्यास यश आले नाही. पण जेव्हा ते रशियाला जाणार हे नक्की झाले तेव्हा आपल्या महाराष्ट्रातून प्रचंड आर्थिक मदत झाली. वाटेगावहून मुंबईत वडिलांच्या बरोबर पायी चालत आलेला अण्णाभाऊ विश्वासाने एकटा विमान प्रवास करुन रशियाला गेले तत्पूर्वीच त्यांनी `चित्रा’ ही कादंबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली होती. अण्णा रशियात गेले.. तेथे त्यांनी 'शिवचरित्र' पोवाड्यातून सांगितले त्याचे रशियन भाषेत भाषांतर झाले. `सुलतान` ही कथा लोकांना आवडली होती. तर `स्टालिनग्राडचा पोवाडा` रशियात लोकप्रिय झाला होता. `फकिरा` कादंबरीच्या १६ आवृत्या निघून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त झाली होती. या पार्श्वभूमीवर रशियात गेल्यानंतर त्यांचं प्रचंड स्वागत झालं. रशियात अण्णांचं चांगलं स्वागत झालं. त्यावर आधारित 'माझा रशियाचा प्रवास' हे प्रवासवर्णनही त्यांनी लिहिलं. आपल्या कार्यक्रमाची सुरवात शिवरायांच्या नावाने सुरवात करणारे आपले अण्णाभाऊ.... शिवचरित्र जगभर पोहचवुन आपले सर्वस्व उपेक्षितांसाठी अर्पिनारे मराठी साहित्याचे सर्वोच्च मानबिँदु "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे" यांचा एक दुर्मिळ फोटो... रशिया वरुन परत आल्यावर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे याँचे airport च्या बाहेर स्वागत करण्यात आले, तो क्षण. आपल्या कार्यक्रमाची सुरवात शिवरायांच्या नावाने सुरवात करणारे आपले अण्णाभाऊ.... शिवचरित्र जगभर पोहचवुन आपले सर्वस्व उपेक्षितांसाठी अर्पिनारे मराठी साहित्याचे सर्वोच्च मानबिँदु "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे" यांचा एक दुर्मिळ फोटो... रशिया वरुन परत आल्यावर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे याँचे airport च्या बाहेर स्वागत करण्यात आले, तो क्षण !!
 
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना-




१६  ऑगस्ट १९४७ ला अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईत मोर्चा काढला. तथाकथित स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवसी हा या स्वातंत्र्याच्या विरोधातील मोर्चा होता. या मोर्च्याला कम्युनिस्टांनी विरोध केला. या पक्षात अण्णाभाऊ कार्य करीत होते. तरीपण हजारो लोकांच्या उपस्थितीत तो मोर्चा झाला. या मोर्चातील प्रमुख घोषणा होती...

 

ये आझादी झुटी है, देश की जनता भुकी है !!




१ मार्च १९४८ ला प्यारीसला जागतिक साहित्य परिषद झाली. या परिषदेचे निमंत्रण अण्णाभाऊ साठे यांना मिळाले होते परंतु जाण्यासाठी केवळ पैसे नसल्यामुळे ते या परिषेदेला जाऊ शकले नाहीत.



२ मार्च १९७८ रोजी पहिले दलित साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून अण्णा भाऊ साठे होते. यात त्यांनी उद्घाटकीय भाषण केले.

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरी वरून निघालेले चित्रपट-




१ वैजयंता ‘ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट   ‘ वैजयंता ‘   साल - १९६१    कंपनी - रेखा फिल्म्स

२ ‘ आवडी’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट  ‘टिळा लावते मी रक्ताचा’ साल –१९६९  कंपनी-चित्र ज्योत

३ ‘माकडीचा माळ’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट  ‘डोंगरची मेना’ साल - १९६९  कंपनी - विलास चित्र

४ ‘चिखलातील कमळ’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘मुरली मल्हारी रायाची’ साल-१९६९ कंपनी -रसिक चित्र

५ ’वारणेचा वाघ’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट  ‘वारणेचा वाघ’ साल - १९७० कंपनी -  नवदिप चित्र

६ ’ अलगूज’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट  ‘अशी ही सातार्याची तर्हा’ साल - १९७४ कंपनी - श्रीपाद चित्र

७ ’ फकिरा’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट   ‘फकिरा’   कंपनी – चित्रनिकेतन

 

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबऱ्या-

 





 
प्रकाशक –  

१) विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे 

२) चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर-२.  


१  आग
२  आघात
३  अहंकार
४  अग्निदिव्य
५  कुरूप
६  चित्रा
७  फुलपाखरू
८  वारणेच्या खोऱ्यात
९  रत्ना
१०  रानबोका
११  रुपा
१२  संघर्ष
१३  तास
१४  गुलाम
१५  डोळे मोडीत राधा चाले
१६  ठासलेल्या बंदुका
१७  जिवंत काडतूस
१८  चंदन
१९  मूर्ती
२०  मंगला
२१  मथुरा
२२  मास्तर
२३  चिखलातील कमळ
२४  अलगुज
२५  रानगंगा
२६  माकाडीचा माळ
२७  कवड्याचे कणीस
२८  वैयजंता
२९  धुंद रानफुलांचा
३०  आवडी
३१  वारणेचा वाघ
३२   फकिरा
३३  वैर
३४  पाझर
३५  सरसोबत


 
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित नाटकाची पुस्तके-

प्रकाशक - विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे 

 



 
१  बरबाद्या कंजारी
२  चिरानगरची
३  निखारा
४  नवती
५  पिसाळलेला माणूस
६  आबी  दुसरी आवृत्ती
७  फरारी
८  भानामती
९  लाडी दुसरी आवृत्ती
१०  कृष्णा काठच्या कथा
११  खुळवाडी
१२  गजाआड पाचवी आवृत्ती
१३  गुऱ्हाळ

 

अण्णाभाऊ साठे यांचे शाहिरीचे पुस्तक-

 


 

शाहीर दुसरी आवृत्ती १९८५, मनोविकास प्रकाशन मुंबई


 

अण्णाभाऊ साठे यांचे प्रवास वर्णन पुस्तक-



 
माझा रशियाचा प्रवास - सुरेश प्रकाशन पुणे

 

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित  वगनाट्ये (तमाश्याची ) पुस्तके-



१ अकलेची गोष्ट
 
२ खापऱ्या चोर
 
३ कलंत्री

४ बेकायदेशीर
 
५ शेटजीचं इलेक्शन
 
६ पुढारी मिळाला
 
७ माझी मुंबई
 
८ देशभक्त घोटाळे
 
९ दुष्काळात तेरावा
 
१० निवडणुकीतील घोटाळे
 
११ लोकमंत्र्याचा दौरा
 
१२ पेंद्याचं लगीन
 
१३ मूक निवडणूक

१४ 
बिलंदर बुडवे

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित  प्रसिद्ध पोवाडे-

 



 
१ नानकीन नगरापुढे
 
२ स्टलिनग्राडचा पोवाडा
 
३ बर्लिनचा पोवाडा
 
४ बंगालची हाक
 
५ पंजाब- दिल्लीचा दंगा
 
६ तेलंगणाचा संग्राम
 
७ महाराष्ट्राची परंपरा
 
८ अमरनेरचे अमर हुतात्मे
 
९ मुंबईचा कामगार
 
१० काळ्या बाजाराचा पोवाडा

 

 

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर असलेले प्रेमं.. निष्ठा -





अण्णाभाऊनी त्यांची "फकिरा" ही कादंबरी डॉ आंबेडकराच्या झुंजार लेखणीला अर्पण केली होती. ६ डिसेंबर १९५६ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महापरीनिर्वान झाले त्यावेळी आणि त्याच्यानंतर सगळ्या देशामधून, राज्यामधून, जिल्ह्यामधुन, तालुक्यामधुन आणि नगरा-नगरा मधून बाबासाहेबांना श्रध्दांजली देण्याचा कार्यक्रम होत होता.



अश्याच वेळी आपल्या महाराष्ट्रातील सगळे त्यावेळेचे ख्यातनाम गायक, ख्यातनाम कवी , शाहीर यांनी ठरवले कि आपण हि बाबासाहेबांना आदरांजली किंवा श्रद्धांजली म्हणुन एक कार्यक्रम ठेवायचा आणि प्रत्येकाने बाबासाहेबांना अभिवादनपद एक गाणं श्रद्धांजली म्हणून गायचे आणि गाण्याच्या रूपाने बाबासाहेबांना श्रद्धांजली द्यायची असे ठरवले.



त्या कार्यक्रमाची तारीख ठरली... अंधेरी मधला एक हॉल निश्चित झाला आणि कार्यक्रम वेळेत सुरु झाला. त्या कार्यक्रमाला वामनदादा कर्डक, भिकू भंडारे , गोविंद म्हशीलकर , प्रल्हाद दादा शिंदे , विठ्ठल उमप, विठ्ठल शिंदे, आणि अण्णाभाऊ साठे असे नामचीन बरेच गायक मंडळी उपस्थितीत होती.



या कार्यक्रमाला सगळेजण स्टेजवर बसून सगळी गायक मंडळी आणि शाहीर मंडळी स्वता:चे आप-आपले गाणे सादर करत होते. या  सगळ्यांचे गाण सादर झाल्यानंतर शेवटी फक्त एकच गायक, एकच शाहीर राहिले होते आणि ते म्हणजे अण्णाभाऊ साठे... तर त्यावेळेस ख्यातनाम कवी, गायक वामनदादा कर्डक अण्णाभाऊंना बोलतात कि "आण्णा" तुला गाणे नाही बोलायचे का...,आणि तू तर गाणे पण लिहून आणले नाही मग तू बाबासाहेबांना गाण्याच्या रूपाने श्रद्धांजली कसा वाहणार गाणे कसा बोलणार...??



मग त्यानंतर अण्णाभाऊ साठे  खिश्यातून पेन आणि कागद काढतात आणि त्यानंतर ते गाणे लिहायला सुरुवात करतात... आणि त्या लिखाणाची, त्या कवितेची, त्या गीतेची सुरुवात आण्णाभाऊ "जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव" ह्या ओळीने करतात..... आणि ते गाण सगळ्या देशात, संपुर्ण महाराष्ट्रात हे गाणं ऐवढ गाजतं  कि त्या गाण्याला देशात कुठेच तोड नाही आणि सगळ्यांना हे गाणं हव हवेसे हे गान झाल आहे... सर्वाना हे गाणं जीवन जगण्यास प्रेरणा देतं. मी खाली ते गाणं देत आहे.


जग बदल घालुनी घाव...


जग बदल घालूनी घाव । सांगुनी गेले मज भीमराव ।।
गुलामगिरीच्या या चिखलात । रुतुन बसला का ऐरावत ।।
अंग झाडूनी निघ बाहेरी । घे बिनीवरती घाव ।।
धनवंतांनी अखंड पिळले । धर्मांधांनी तसेच छळले ।।
मगराने जणू माणिक गिळीले । चोर जहाले साव ।।
ठरवून आम्हा हीन अवमानीत । जन्मोजन्मी करुनी अंकित ।।
जिणे लादून वर अवमानीत । निर्मुन हा भेदभाव ।।
एकजुटीच्या या रथावरती । आरूढ होऊनी चलबा पुढती ।।
नव महाराष्ट्रा निर्मुन जगती । करी प्रगट निज नाव ।।



गीतकार- साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे.


(संदर्भ- ही माहिती मला गेल्यावर्षी मुंबई मधील यशवंत नाट्यगृह येथे आण्णाभाऊं साठे यांच्या  जयंतीच्या कार्यक्रमाच्या वेळेस सुप्रसिद्ध गायक विष्णू शिंदे आण्णाभाऊंचे जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव हे गाणे सादर करताना मिळाली आणि त्या कार्यक्रमात महारष्ट्राचे मा.मुख्यमंत्री देखील हजर होते.)

 

 

अण्णाभाऊनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर फक्त जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव  हे गीत लीहले आहे... जेव्हा एका पत्रकाराने अण्णाभाऊ यांना विचारले.... अण्णाभाऊ तुम्ही बाबासाहेब यांच्यावर कादंबरी का नाही लिहली ?? तेव्हा अण्णभाऊ त्या पत्रकारावर संतापले आणि म्हणाले... अरे बाबासाहेब सूर्य आहे आणि त्या सुर्याला मी एका पुस्तकांत कैद करूच शकत नाही.... ज्यांनी बाबासाहेबांवर पुस्तकं लिहली त्याच्या लेखणीला आणि त्यांना माझा दंडवत. बघा किती आदर करत होते अण्णाभाऊ बाबासाहेब यांचा.

 

 

अण्णाभाऊ साठे यांचे "फकिरा" कादंबरी मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर असलेले प्रेमं -

 


"लौकर चला ! बेडसगावच्या त्या बामनाच्या वाड्यात ती दौलत अडकून पडलीय" फकिरा आवाज चढवीत म्हणाला,"तिला मोकळी करा ! हो , पन आदी मला आईला , बाबाला , थोरल्या आईला एकदम भेटून येऊ दे. पर तुम्ही मानसांची जुळनी करा ! शंभर मानसं कडवी घ्या नि चला"

 

हे सारं भिवानं ऐकलं होतं. तो पुढं म्हणाला , "पर बामनाकडं बंदूक हाय. आनी बंदुकीपुढं बळ बेकार व्हतं. भलताच मार हाय, म्हनं"
"माझं बळ तोफेपुढे बेकार व्हनार हाय !" फकिरा तीव्र स्वरात म्हणाला , "बंदूक ? असू दे बंदूक ! किती गोळ्या उडवील ती ? एक एक मानूस दहादहा गोळ्या खाऊ या ! पन जरा मानसावानी नि हिंमतीनं ! पंत म्हनीत , एक राजा हतं झाला. त्येचं नाव मी इसरलो. त्यो राजा म्हनत व्हता , शेळी हूनशान शंभर वर्सं जगन्यापरास वाघ हूनशान एक दिवस जगावं. आनी त्येच खरं हाय. वाघच होऊ नि वाघासारखं मरू या ! चला . जमवा मानसं नि चला"

 

 

  

या परिच्छेदातील " त्यो राजा म्हनत व्हता , शेळी हूनशान शंभर वर्सं जगन्यापरास वाघ हूनशान एक दिवस जगावं. " हे वाक्य कुणासाठी आलं असेल ? अर्थातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अण्णाभाऊ साठे यांनी केलेले हे मानाचे वंदन आहे… फकिरा या बहुचर्चित कादंबरीत बेडसगावचा खजिना लुटण्याची योजना आखतो तेव्हा भिवा शंका व्यक्त करतो म्हणून फकिरा त्याला वरील उत्तर देतो. याच कादंबरीत जॉन साहेबांपुढे समर्पण करताना फकिराने हातातली तलवार टेबलवर ठेवली तेव्हा जॉन साहेब फकिराला विचारतात ,"ही तलवार कुठं मिळाली ? " तेव्हा फकिरा म्हणतो , " ही तलवार माझ्या पूर्वजाला शिवाजीराजानं दिली " ही तलवार घेऊन माझा बाप खोतासंग लढला नि मी हिला घेऊन तुमच्याशी लढलो "  तलवारीला धार नसेल तर , ती काय कामाची ? धारं वाचून तलवार नि बळावाचून बंड लटकं असतं "छत्रपति शिवराय आणि क्रांतिसूर्य भीमरायांच्या स्वाभिमानी हिंमतबाज लढयाला अण्णाभाऊ आपल्या कादंबरीतून केवळ वंदन करीत नाही तर ती जनतेपुढे आणून प्रेरणा देतात. फकिरा हे अण्णाभाऊ साठे यांचे मामा होते. मांग- महारांच्या शौर्याची गाथा असलेली ही कादंबरी अण्णाभाऊनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली आहे.
 


अण्णाभाऊ साठे यांचा दुसरा विवाह-


पक्षाच्या कामासाठी फिरताना अण्णाभाऊंचा पुण्यातल्या जयवंताबाई या तरुण विवाहित महिलेशी परिचय झाला. काही कारणाने जयवंताबाई आपल्या पतीबरोबर राहत नसत. पुढे अण्णांनी जयवंताबाईंबरोबर आपला दुसरा विवाह केला. या विवाहामुळे त्यांना बरंच स्थैर्य मिळालं आणि कलानिर्मितीसाठी आवश्यक असलेला कौटुंबिक पाठिंबाही मिळाला.



शेवटच्या काळात मात्र त्यांच्या जयवंताबाईंबरोबरच्या नात्याला अनपेक्षितरीत्या ओहोटी लागली आणि जयवंताबाई आपल्या कन्येकडे निघून गेल्या. त्यांच्या जाण्याचा अण्णाभाऊंना धक्का बसला आणि त्यांचं मद्यपान प्रमाणाबाहेर वाढू लागले. लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण न घेता साहित्य क्षेत्रात जगप्रसिद्ध झालेला हा कलाकार काही दुर्दैवी (वैयक्तिक कौटुंबिक) संघर्षांमुळे खचत गेला. सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांनी कम्युनिस्ट चळवळीत कार्य केले परंतु कम्युनिस्ट लोकांनी शेवटी साथ दिली नाही. शेवटच्या काळात अण्णाभाऊ साठे यांना खाण्यास अन्न देखील मिळत नव्हते... ही किती भयानक बाब म्हणावी लागेल. अण्णाभाऊ साठे यांच्या शेवटच्या काळात महाराष्ट्र सरकारने त्यांना बरेच सहकार्य केले. मनाने खचलेल्या अण्णाभाऊ साठे यांचे वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी १८ जुलै, १९६९  मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या साहित्याच्या व कार्याच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक अन्यायामुळे जो समाज शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, त्या समाजामध्ये आत्मविश्र्वास व प्रगतीची आस निर्माण केली. 




अण्णाभाऊंचं झोपडीवर अतिशय प्रेम होतं. 'जे जगतो तेच मी लिहितो` असं ते सांगत. ४५ कादंबर्‍या, १५० कथा, तीन नाटके, ११ लोकनाट्ये, ७ चित्रपटकथा व असंख्य लावणी पोवाडे असे त्यांचे साहित्य प्रसिध्द झाले. इथेच त्यांच्या प्रतिभेला बहर आला. कोणतीही ज्ञानाची शिक्षणाची परंपरा इथे त्यांना लाभली नाही. आज त्यांचे साहित्य अनेक देशी-विदेशी संस्थांच्या अभ्यासक्रमाचा भाग बनले आहेत. 





काय मित्र-मैत्रिणीनो आता तुम्हीच एक माणुस म्हणून सांगा खरां मराठी दिन कोणता ?? 


प्रिय मित्र-मैत्रिणीनो "१ ऑगष्ट" हा दिवस म्हणजे "साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे" यांचा जन्मदिन. काही विशिष्ट जातीला कायम वरचे स्थान देण्यासाठी. एका मनुवादी पक्षाच्या महाराष्ट्रातील  मुख्यमंत्र्याने वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन 'मराठी भाषादिन' म्हणून जाहीर केला आणि तेव्हा पासून महाराष्ट्रातील मनुवाद्यानी 'मराठी दिनाचा' पुळका येवू लागला. जेमतेम १७ पुस्तके लिहिणारे कुसुमाग्रज आणि नुसत्या कादंबरीची संख्या ३५ असणारे "साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे" यांची तुलनाच होऊ शकत का???  तेव्हा उठा... जागे व्हा मित्र-मैत्रिणीनो...  आपल्या गावातील, शहरातील, मातंग समाजासह सर्व बहुजन समाजाची अस्मिता जागी करा आणि उद्या प्रत्येक तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढा.... निवेदन सादर करा... "साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे" यांचा जन्मदिन "१ ऑगष्ट " हा दिवस "मराठी भाषा दिन" झालाच पाहिजे... झालाच पाहिजे.... झालाच पाहिजे... अण्णाभाऊ साठे जयंती दिन हाच मराठी भाषा दीन... मित्र-मैत्रिणीनो... शासन जेव्हा साजरा करेल तेव्हा करो... पण आपण या १ ऑगस्ट पासून शिवरायांच्या या सच्च्या वारसदाराचा सन्मान म्हणून "मराठी भाषा दिन" साजरा करुया..  

 

  

 

अण्णाभाऊ साठे यांच्या ९३ व्या जयंतीच्या व मराठी भाषादिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!"


साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जीवनप्रवास मांडणारा VIDEO नक्की बघा...

 http://abpmajha.newsbullet.in/videos/cultural/31942-2013-08-01-06-27

संदर्भ-

१ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निवडक वाङ्‌मय- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 
२  अण्णाभाऊ साठे- लेखक - बजरंग कोरडे , साहित्य अकादमी प्रकाशन.
 
३  अण्णाभाऊ साठे-  समाजविचार आणि साहित्यविवेचन, लेखक- डॉ. बाबुराव गुरव ,लोकवाङ्‌मय गृह.
 
४  अण्णाभाऊ साठे यांचे पोवाडे व लावण्या, प्रकाशक : लोकवाङ्‌मय गृह
 
५  माझा भाऊ अण्णाभाऊ- लेखक- शंकर भाऊ साठे.

  

                               जय लहुजी 

            तमाशासम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावंकर


महाराष्ट्र शाशनाने विष्णू भावे पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आलेल्या तमाशासम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावंकर यांच्या पुण्यतिथी निमित्त मानाचा मुजरा.@mps
विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर. एकेकाळी तमाशा क्षेत्रात दुमदुमलेले नाव. वयाच्या 10व्या वर्षापासून पायात घुंगरू बांधून कलाकार म्हणून प्रेक्षकांवर हुकुमत गाजवणारी लावणी नृत्यांगना. सावळा, परंतु देखणा चेहरा, गोड गळा आणि त्याच्या वरचढ अभिनय अशा कोंदणात चमचमणा-या विठाबार्इंच्या जीवनचरित्राची भुरळ जनसामान्य रसिकांना पडणे तसे स्वाभाविकच. पुरुषांच्या जगात वावरलेल्या विठाबाई जिवंतपणीच दंतकथा बनल्या. लफडेबाज, विकृत, व्यसनाधीन असे हिणवून निंदानालस्ती करणा-यांची पर्वा न करता मायबाप प्रेक्षकांनी विठाबार्इंना ‘तमाशासम्राज्ञी’ ही पदवी बहाल केली. आयुष्यभर अत्यंत पोटतिडकीने रसिकांची करमणूक केलेल्या ‘विठाबाई’ नावाच्या या ठिणगीवर काहींना चित्रपट बनवण्याची बुद्धी झाली आणि त्यायोगे पुन्हा एकदा प्रेक्षकांची करमणूक करण्यासाठी विठाबाई सिद्ध झाली, असेच म्हणावे लागेल.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जवळच्या लोकांनी केवळ व्यवसायासाठी विठाबार्इंशी संबंध जोडला. आता मरणोत्तरही चित्रपटाच्या अनुषंगाने त्यांच्यावर एकाच वेळी दोन निर्मात्यांनी चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. एका अर्थाने पुन्हा एकदा व्यवसायाच्या तराजूत विठाबार्इंना तोलले जाणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात प्रथम विठाबार्इंसारख्या एका तमाशा कलावंतावर चित्रपट येतोय, याहून समाधानाची गोष्ट नाही; पण आता जो चित्रपट येईल, तो दर्जेदारच असावा, अशी माफक अपेक्षा बाळगली तर त्यात वावगे ते काय?
लहानपणापासून होत असलेली उपासमार, वयाच्या दहाव्या वर्षापासून सुरूझालेली विठाबार्इंची तालीम, 15 वर्षे वयाच्या कोवळ्या वयात एका व्यापा-याने केलेला बलात्कार, त्यातून स्वत:च्या तारुण्याची झालेली विखारी जाणीव, पुढे याच मानसिकतेत तारुण्याच्या जोरावर नाव कमावलेली धाडसी नृत्यांगना, प्रेक्षकांवर हुकुमत गाजवणारी कलासक्त स्त्री, अनेक पुरुषांशी तिचा आलेला संबंध, तारुण्य ओसरल्यानंतर वाट्याला आलेले उपेक्षित वार्धक्य, असे चित्तथरारक आयुष्य चित्रपटाच्या दृष्टीने खाद्य ठरणारच. मात्र, विठाबार्इंवर एकाच वेळी दोघांना चित्रपट बनवण्याची दुर्बुद्धी सुचते आणि वाद सुरू होतात. विठाबार्इंच्या आयुष्यावर आजवर केवळ जगदीश खेबुडकर आणि योगिराज बागुल या दोघांनीच लिखाण केले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि एकूणच कारकीर्दीचा आवाका ध्यानात घेता हे लिखाण तुटपुंजे असले तरी त्यांच्याबद्दलच्या ऐकीव कहाण्या मात्र विपुल आहेत. जगदीश खेबुडकरांच्या पटकथेवर आधारित संतोष राऊत यांनी चित्रपट तयार करायचा घाट घातला असतानाच, दुसरीकडे पुंडलिक धुमाळ यांनी योगिराज बागुल यांच्या पुस्तकाच्या आधारे चित्रपटाची सुरुवात केली. यामुळे विठाबार्इंवर उपलब्ध असलेल्या केवळ दोन साहित्यकृतींचे दोन भाग होणार, परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी इतके साहित्य पुरेसे नाही, हे चित्रपट बनवणा-यांना कसे काय लक्षात आले नाही, याचे आश्चर्य वाटते. गंमत म्हणजे, विठाबार्इंवर चित्रपटांच्या निमित्ताने संशोधन करण्याच्या दृष्टीने लावणी, तमाशा या कलाप्रकाराशी संबंधित जी काही मोजकी नावे आहेत त्यांच्या भेटीगाठी हे दोन्ही दिग्दर्शक घेत आहेत. यात दत्तोबा फुलसुंदर, संभाजी जाधव, साहेबराव नांदवळकर, मधुशेट नेराळे, अण्णा कामेरकर, प्रकाश खांडगे यांनी पाहिलेल्या वा अनुभवलेल्या विठाबार्इंवर दोन्ही दिग्दर्शकांना सारखीच माहिती मिळणार; मग दोन्ही चित्रपट वेगवेगळे कसे ठरणार, असा प्रश्न पडतो. या आधीही पुलंची ‘म्हैस’ आणि महानोरांचे ‘अजिंठा’ या दोन साहित्यकलाकृतींवरही अशीच वेळ आली आणि वादाच्या भोव-यात अडकून मूळ ‘कला’ बाजूलाच राहिली. असेच काहीसे विठाबार्इंच्या बाबतीत होणार हे दिसल्याने लोककलावंत दुखावला जातोय याचे भान कुणीच ठेवताना दिसत नाही. चार -दोन ठिकाणी सादर करायला मिळणारी संधी सोडल्यास महाराष्ट्रातली लोककला तशी उपेक्षित राहिली आहे. महाराष्ट्रातले लोककला प्रकार सरकारी उदासीनतेमुळे हतप्रभ झाले. अशा वेळी विठाबार्इंसारख्या अशिक्षित तमाशा कलावंताच्या आयुष्यावर चित्रपट तयार होणे, ही त्या क्षेत्राच्या दृष्टीने लाभदायक गोष्ट. त्यात तमाशा व्यवसायाचे वस्तुनिष्ठ चित्रण चित्रपटात होईल, अशी सर्वच तमाशा कलावंतांची अपेक्षा आहे. मुंबईतल्या हनुमान तमाशा थिएटरचे मालक मधुशेट नेराळे यांच्या म्हणण्यानुसार चित्रपटात विठाबाईला ‘आदर्श’ म्हणून आणायचे असेल तर त्यांच्यातल्या अवगुणांनाही यशाचा एक भाग म्हणून दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शकांनी योग्य रीतीने पार पाडावी. विठाबाई ही तमाशा क्षेत्रातली प्रातिनिधिक स्त्री दिसली पाहिजे. विठाबार्इंचे व्यक्तिगत जीवन विखारी निंदानालस्तीला तोंड देण्यात गेले असले तरीही सार्वजनिक जीवनात त्यांची प्रतिमा किंचितही डागाळलेली नाही, हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे भूमिकेचे चित्रण करावे. विठाबाई तमाशा फडात काम करत असल्या, अनेक पुरुषांसोबत त्यांचे संबंध आले असले तरी त्या बाजारू स्त्री नव्हत्या, हेही ठसठशीतपणे दाखवता आले पाहिजे. एकूणच मधुशेट म्हणतात त्याप्रमाणे चित्रपट बनवताना दिग्दर्शकाला शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. तसेच विठाबार्इंनी जो काळ गाजवला त्या काळातले संगीत आणि आजच्या पिढीच्या आवडीचे संगीत यांचा मेळ घालून योग्य अशा लावण्या बसवाव्या लागतील. केवळ चित्रपट चालावा या दृष्टीने उडत्या चालीच्या लावण्या बसवल्या, तर विठाबाई हे काल्पनिक पात्र होऊन जाईल. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात सिनेमात नेसवल्या जाणा-या ‘लो वेस्ट’ रेडिमेड नऊवारी साड्यांवरही मधुशेट यांनी परखडपणे टीका केली. अभिनयात गुणवत्ता नसेल तर नटीला अशा प्रकारे अंगप्रदर्शन करावे लागते असे म्हणत विठाबार्इंच्या देहावरच नव्हे, अभिनयावर प्रेक्षक प्रेम करायचे, असेही त्यांनी सांगितले.
‘नाळ’ कथेचा बाजार
असे म्हणतात, की विठाबाई गरोदर असताना नवव्या महिन्यात नाचण्यासाठी उठल्या आणि नाचता नाचता पोटात कळा येऊ लागल्याने रंगमंचामागे गेल्या. तिथेच बाळंत झाल्या आणि नाळ दगडाने ठेचून प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पुन्हा स्टेजवर नाचण्यासाठी आल्या. नाळ ठेचण्याची ही कथा या आधी सिंधुतार्इंच्या बाबतीतही त्यांच्या चित्रपटात दाखवण्यात आली. याचा अर्थ एक तर विठाबार्इंपासून सिंधुतार्इंपर्यंत नाळ ठेचण्याची कृती हे एखाद्या स्त्रीने आयुष्यात किती खस्ता खाल्ल्या आहेत हे दाखवण्याचे एकमेव परिमाण आहे, असा (गैर)समज प्रेक्षकांचा होऊ शकतो. विठाबार्इंची ही दंतकथा आजही छातीठोकपणे व्यासपीठावर सांगण्याच्या कौशल्याचे कौतुक करावे तितकेच कमी. याचा वापर तद्दन व्यावसायिकदृष्ट्या झाला तरी त्यात आश्चर्य वाटायला नको. ‘पोटासाठी नाचते मी पर्वा कुनाची?’ ही लावणी अजरामर केलेल्या विठाबार्इंना केवळ पोटासाठी नव्हे, तर कलेसाठी नाचावेसे वाटले. पोटासाठी नाचल्याने कुणी मोठे होत नाही; मात्र कलासक्त विठाबार्इंनी जितके नाव कमावले तितकाच पैसादेखील कमावला. चित्रपट कोणताही यशस्वी होवो मात्र ‘तमाशा’च्या फडावर बिजलीसारख्या कडाडणा-या विठाबार्इंची त्या निमित्ताने आठवण निघेल आणि नव्या पिढीला महाराष्ट्राच्या एका कोप-यातल्या तमाशा या कलाप्रकाराशी तोंडओळख होईल, एवढीच माफक अपेक्षा तमाशा अभ्यासक आणि रसिकांची आहे.

Matang Panchayatan Sangh's photo.

@एमएसएस  -जय लहुजी 

50 comments:

  1. Very great literature written by you .I request you to mention matang in A Jain and budhhist religion .In jain religion matang have great honour and The first tirthankar rishibha grandson founded matang race ,And many notable person in jain religuon and other hand The kashyapa matang are notable person in budhhist religion who spread budhissum all around the world .So matang belong to sramnic religion such as budhiiaum and jain and not Sanatani religion who spred hatred against so called shudra .so jai lahuji ,jai mulnivasi .

    ReplyDelete
  2. राजा प्रसेनजीत बद्दल पण लेख मिळेल का??

    ReplyDelete
  3. मांग समाजातील दुसरे कोणते आजून महापुरुष झालेत का

    ReplyDelete
  4. खरच खुप छान माहीती दिली आहे अशी आजुन टाका

    ReplyDelete
  5. खरच खुप छान माहीती दिली आहे अशी आजुन टाका

    ReplyDelete
  6. जय लहुजी, जय शिवाजी...!

    ReplyDelete
  7. (कंसा पुढील लेख स्पष्टपणे चुकीचे आहे. मातंग समाजाला देवा धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करु नका.
    आता कुठे तरी या ब्राम्हणाच्या धार्मिक जातिय षडयंत्राच्या गुलामीतुन बाहेर निघत आहे . सर्व प्रथम तुम्ही कोणत्या जातिचे ते स्पट करा मातंग समाज हा आता पर्यंत कोणाचेही सांगणे खरे समजत आला आहे परंतु आता मात्र ही तरूण पिढी येड्यात निघणार नाही. मातंगाचा इतिहास स्वर्ण सांगत आले आणि आम्ही ते खरे समजले.
    परंतु आमचा खरा इतिहास क्रांती सूर्य लहुजी ऊस्ताद आणि साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व भारतरत्न प.पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाच आमचा इतिहास आहे. आमचा मातंग समाज भोळा आहे सहज स्वर्णावर त्यांच्या सांगण्यावर विस्वास ठेवत होता. परंतु आता तुम्ही येड्यात काढण्याच काम सोडून द्या.
    )>>>>>>

    मातंग समाज अतिशय पुरातन कालापासून असून ती एक राजकीय जमात होती. या समाजात थोर ऋषि, मुनि, योगी पुरुष, व महान असे विचारवंत होऊंन गेले. मातंग समाज प्रगल्भ विदवत्ता धारक होता. या समाजाने विविध विषयात नावीन्य प्राप्त केले होते. जप तप, साधना , आराधना, सत्वशील वृत्ति, तसेच शौर्य, ध्येय या विशेष गुणांनी संपन्न होता. गुरुकुलांची परंपरा असणारा समाज शुद्र अतिशूद्र वर्गात कसा गेला ? त्याला वाळीत कोणी टाकले ? याचे चिंतन करने गरजेचे आहे.
    जो समाज भूतकाळ विसरतो तो भविष्यात प्रगति करू शकत नाही. जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. म्हणून मातंग समाजाला भूतकाळ म्हणजे इतिहास सांगण्याची गरज भासू लागली आपल कुळ काय ? आपल गोत्र काय ? आपले पूर्वज कोण होते याचे स्मरण करने आवश्यक वाटते कारण माणूस ज्याचे स्मरण करतो त्याचशी संबध जोडत असतो. आपल्या पूर्वजांचे मौलिक विचार मातंग समाज विसरलेला आहे. मातंग समाजाचा पूर्व इतिहास पुन्हा तेजोमय किरणा ने अंधाराकडून प्रकाशाकडे घेवून जाणारा आहे. आपल्या तरुण पिढीला जागृत करन्यासाठी नव संजिवनी देण्यासाठी आणि शुद्राकडून ब्राह्मण्य कड़े वाटचाल करण्यासाठी मानव निर्मिति पासून आजपर्यंत चा इतिहास सांगणे आवश्यक आहे.

    श्रीकृष्णाचे गुरू मातंग ऋषी सांदीपनि-
    अवंती [उज्जैनी ]वनात एक सांदीपनि नावाचे मातंग ऋषी आपले सह परिवारा राहत असत। चारी वेद निपुण होते। परस्री आणि परधन या कड़े त्यांचे लक्ष नसे.भाग्यवंताची स्तुती करावी आणि दुबळ्याची हेटाळणी करावी असा भेदभाव करत नसत . त्यांच्या जवळ अहंकाराला थारा नव्हता . सांदिपनी ऋषी स्वावलंबी होते . अरण्यात शिन्दीची झाडा वरील पनाळ्या ते आपल्या हातातील शास्राने मंत्र उपचाराने झाडावर न चढता अपोआप तोडत असत त्या मुळे त्यांचे नाव शिंदी पाल पडले होते . सांदिपनी आपल्या शिशांच्या हृदयातील आध्ञान चा अंधार दूर करून ध्यानाचा प्रकाश पाडून देण्यात ते तरबेज होते . सांदीपनी ऋषी बुद्धिवान आणि अनेक गुंनानी संपन्न होते.

    कृष्ण -बलराम -सुदामा यांना सांदीपनि ऋषि कडून अनुग्रह -
    सांदीपनी ऋषीची शिकवण -दुसऱ्याच्या नाशाची कधीही इच्छा करू नये. इंद्रिय मनावर ताबा मिळवावा.रागा लोभाने भावना प्रधान होऊ नये.आपण कोणाचेही वाईट करू नये.निंदकास क्षमा असावी.परोपकार हेच पुण्य व पर पिडा हे पाप समजावे ,अशी शिकवण ते देत असत. सांदीपनी ऋषीचे उपदेश कार्य शुद्ध प्रेम भक्ती ,शांती ,प्रिती , आणि मुक्तीचा मार्ग म्हणून श्रीकृष्ण ,बलराम ,सुदामा हे सदैव देहभान व रममाण होत असत . श्रीकृष्ण ,बलराम ,सुदामा हे सांदीपनी ऋषी कडे आश्रमात चौसष्ट दिवस होते . या काळात सर्व विध्या मुक्त हस्त पणे अवगत केल्या .
    [हरीविजय २० अद्याय ]-श्रीकृष्णाने गुरु पुत्र स्वर्गातून जिवंत करुण गुरुस परत दिला
    मातंगी माता -
    [मातंगी पुर्नत्व उच्चते]
    //ओम र्हिं मातंगी महामाये सदानंद स्वरूपिणी //
    //प्रणामामी सदा अंबे मातंगी माधुरानाना //
    शिवशक्तीच्या दहावा अवतार पैकी नववा अवतार शंकर पार्वतीने मातंग-मातंगी म्हणून घेतला . मातंगी महादेवाची कश्ती असून सर्व देवदेवता ची वरदायिनी आहे . मातंगी देवीला संतती व संपती राखणारी देवी म्हणून पुजीले जाते . दक्षिण भारतात मातंगी स मांगम्मा असेही म्हणतात .तिरुपति ,बालाजी ,चेन्नई येथे देवीची मंदिरे आहेत . आंध्र ,गुजरात ,तामिळनाडू या प्रांतामध्ये मातंगी मंदिरे आहेत .
    महा लक्ष्मी तुळजापुर ची देवी हि मातांगाचीच आई आहे .[हरिचंद्र व्याख्यान ]

    ReplyDelete
  8. खरंच खूप छान आहे माहिती

    ReplyDelete
  9. जय लहुजी जय आणा

    ReplyDelete
  10. माहिती छान आहे...

    ReplyDelete
  11. Khup changli mahiti aahe.abhinandan

    ReplyDelete
  12. khup chayn Pudil kamasati subhechy

    ReplyDelete
  13. समाजाचा खुपच छान आहे परंतु ईतिहास समजाऊन सांगण्याचा प्रयत्न पुढे होऊन का कोणी करत आतापर्यंत मि बघीतले की.आणेक समाजिक संघटना आहे संस्थापक आहे परंतु त्यांना समाजाचा ईतिहास सांगतांना मि बघीतले नाही आणि ऐकला ही नाही आधी तःयानी ईतिहास समजाऊन घ्यानेचा प्रयत्न करावा आस मला तरी वाटतं
    मला एक गोष्ट नेहमी खटकते की प्रत्येक समाजाला धर्म गुरु आहेत ते समाजाविषयी महीती पोहचविण्याचे कार्य ते करतात मंग मायतंग समाजाला धर्मगुरु का नाही आणि धर्मगुरु आसेल कलवा

    ReplyDelete
  14. मि तुमचा पुर्ण लेख वाचला मातंग समाज पुरातणकाली ऐवढा आग्र स्थानी होता तर मंग समाज आधोगतीकडेच वाटचाल करतांनां का दिसतो आहे प्रगती कडेवाटचाल का करत नाही
    आणि समाजाला दिशा दाखवण्याचे का कोणी करत नाही
    त्यासाठी काही जाणकार लोकाणी पुढे यायला हवे जागतिक परिषदा घ्यायला हाव्येत जर का समाजिक परिषद घेऊन समाजाचे महत्व पटवुन दिले तर समाज निश्चितच प्रगती कडे करेल यात शंका नही


    धन्येवाद

    आशिच माहीती पोहचविण्याचे काम करवी आशि मि ईच्छाव्यक्त करतो
    पुढील वाटचालीस शुभेच्छा

    ReplyDelete
  15. खुपच सुंदर लेख/महिती मिळाली. धन्यवाद

    ReplyDelete
  16. Khup chaan mahiti aahe

    ReplyDelete
  17. तुम्ही ही महिती प्रविष्ट केल्या बदल तुमचे तुमचे मनापासून अभिनंदन

    ReplyDelete
  18. लहुजी साळवे यांचा जीवन काळ १७९४ ते १८८१ आहे तर तालीम १८८२ कशी आणि कोणी सुरू केली कृपया उत्तर द्या

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, उमाजी नाईक, फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.

      Delete
  19. जय लहुजी ही घोषणा कोणी दिली आणि कोणत्या संघटनेनी दिली

    ReplyDelete
  20. मातंग समाजाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे ही आंबेडकरी साहीत्यात आहे ,जर भारतातील सर्व दलीत समाज मग ताे कुठल्याही जातीचा असाे ताे बाबासाहेब आंबेडकरांना बाप मानून आंबेडकरी चळवळ मजबूत करताे तर तुम्ही मागे का?आंबेडकरी चळवळ ही फक्त महारांची नाही आहे तर सर्व मानव जातीची आहे ,सर्वात प्रथम आपन हे डाेक्यातून काढल पाहीजे की बाबासाहेब फक्त महारांचे आहेत तर बाबासाहेब जेवढे महारांचे आहेत तेवढेच ते मांगांचे चांभारांचे आणी सर्व शाेषीत जातींचे आहे ,मांगानी मागे राहू नये दलीत आंबेडकरी चळवळ आता मांगानी पुढे न्यावी हीच बाबासाहेब ,आण्णा भाऊ साठेनां आदरांजली ठरेल.

    ReplyDelete
  21. पुढील लेख तुम्हाला या विषयाची वेगळी माहिती देईल:
    मातंग समाज का इतिहास और जैन धर्म
    https://jainmission.wordpress.com/2020/05/29/jain-matangs/

    ReplyDelete
  22. खूप छान लेख वाचून आनंद वाटला.....जय लहुजी....

    ReplyDelete
  23. हा लेख मातंग समाजातील प्रत्येक घराघरपर्यंत पोहचला पाहिजे....

    ReplyDelete
  24. 🚩मातंग(मांग) आणि महार या दोघांचे नावे इतिहासात सोबतच घेतले जातात , जसे दोघे सक्के भाऊ च आहेत , आणि ते मुळात आहेतच भावंड..
    जिथे मांग तिथे महार असतातच व जिथे महार तिथे मातंग मांग असतातच दोघांनी आपली साथ कधीच सोडलेली दिसत नाही , जरी ते एकमेकांना वर रुसतील फुगतील पण दोघे सोबतच वावरताना दिसतात ...
    कोणी सवर्ण (मांगा महारांची लोकं ) असे उदगार काढतात तेही दोघांची नावे सोबतच घेतात ही साक्ष आहे की दोघेही पूर्वीपासून एकमेकांना सोबतीच राहिलेले आहे...

    ReplyDelete
  25. आपल्याच म्हणजे मातंग लोकांनाच आपली प्रगती सहन होत नाही
    एकमेकांवर जळतात हे लोकं त्यामुळे मातंग समाजाची प्रगती होत नाहिये,हा समाज संघटित नाही म्हणून मागासलेला आहे या युगांमध्ये ही काहि लोक फुकट लोकांची गुलामगिरी करतात,बर्याच ठिकानी मला या लोकांवर आणखी सुधा अत्याचार होत असल्याच दिसुन आलं,आणखी ही बर्याच ठिकानी छुआ:छुत हा प्रकार चालू आहे. हे थांबवायला हवे. धन्यवाद:


    तुम्ही दिलेला लेख मात्र खुप छान होता..

    ReplyDelete
  26. अतिशय उत्तम उपक्रम चांगली व खरी माहीती

    ReplyDelete
  27. मातंग समाजाचा पूर्वेतिहास संघर्षमय व प्रेरणादायी आहे.पण स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात मातंग समाजाला असे कोणते ग्रहण लागले की त्या ग्रहणामुळे मातंग समाज आज आपल्याच तोर्यात आहे.महात्मा फुले, छत्रपती राजश्री शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्कार्यातून प्रेरणा घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कष्टकरी समाजाचे दारूण चित्र आपल्या लेखणीने भारतीय समाजापुढे मांडले.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र अखिल मानव जातीला दिला.याचे अवलोकन करून मातंग समाजाने आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे.

    ReplyDelete
  28. यु के घाटगे सर

    ReplyDelete
  29. Absolutely great information.
    It's helpful me to understanding history about mang(matang) cast,
    Very very great literature written by you.

    ReplyDelete
  30. जय लहुजी फार सुंदर माहिती मिळाली चांगला इतिहास असताना अस्प्रुश कसे झाले कोणी व केव्हापासून करण्यात आले .

    ReplyDelete
  31. 🙏Jai gurudev🙏...Samajàne Daru V Man's khane sodayala pahije Tasech Shikayala pahije..samajh Javad Aala pahije.Shakahara chi chadvad samajhat Chalavali geli pahije.samajat Shakaharane Pragati fast hoil.

    ReplyDelete
  32. खूप छान माहिती आहे हे वाचून मन अगदी प्रसन्न झालं आहे.की आपले पूर्वज खरच खूप शुर विर होते.जय लहूजी जय अण्णा.जय भीम....

    ReplyDelete
  33. मांग समजा मधील जाती

    ReplyDelete
  34. मातंग समाजाने अगोदर घरातील देव्हाऱ्याला तडीपार करायला हवं...समाजाचे सर्वात जास्त वाटोळं या देव्हाऱ्याने केलं आहे..

    ReplyDelete
  35. मातंग हे हिंदू नाहीत, अंद्ध श्रद्धा नाहीत आणि तेहतीस कोठी देवांचाही कांही संबंध नाही. जैन धर्मातही मातंगांचं योगदान आहे . मातंग हा बौद्ध धम्मातील एक वंश आहे.

    ReplyDelete